बिग बॉस फेम सपना चौधरीच्या गाडीला अपघात

हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या गाडीला अपघात झाला (Sapna Chaudhary Car Accident) आहे.

Sapna Chaudhary Car Accident, बिग बॉस फेम सपना चौधरीच्या गाडीला अपघात

नवी दिल्ली : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या गाडीला अपघात झाला (Sapna Chaudhary Car Accident) आहे. शॉपिंग करण्यासाठी गेलेल्या सपना चौधरीच्या फॉर्च्युनर गाडीला वेगाने आलेल्या एका गाडीने मागून धडक दिली. नवी दिल्लीतील गुरुग्राम या ठिकाणी हा अपघात घडला. सुदैवाने सपना चौधरी या अपघातात बचावली (Sapna Chaudhary Car Accident) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (27 डिसेंबर) गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सपना आपल्या ड्रायव्हरसोबत शॉपिंगसाठी गेली होती. त्यावेळी दिल्लीतील वाटिका चौकाजवळ मागून वेगाने आलेल्या एका गाडीने तिच्या फॉर्च्यूनर गाडीला धडक दिली.

सपनाच्या ड्रायव्हरने त्या गाडीच्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला. यामुळे सपनाच्या गाडीला धडक दिलेल्या गाडीचा नंबर किंवा कार चालकाची ओळख अद्याप पटलेली (Sapna Chaudhary Car Accident) नाही.

 

View this post on Instagram

 

I love myself………❤️ #interview #interviewoutfit #desiqueen #beingdesi #loveyourself #thankgod #positivevibes #thaknamnahai??

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

मात्र यात तिच्या गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबत तिने अद्याप कोणतेही तक्रारी केलेली नाही. पण जर याबाबत तक्रार आली तर त्या चालकावर नक्कीच कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

Always look on the bright side of life ? . Styling by @suchirevasharma #desiqueen #loveyourself #thankgod #publiclove #positivevibes

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on


दरम्यान सपना चौधरीने हरियाणातील चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर ती हिंदी बिग बॉसमध्येही दिसली होती. बिग बॉसमध्ये ती चांगलीच चर्चेत आली होती. घराघरात तिच्या नावाचीच चर्चाही रंगू लागल्या होत्या. विशेष म्हणजे बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिला लगेचच भोजपूरी चित्रपटाची ऑफर मिळाली (Sapna Chaudhary Car Accident) होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *