‘बागी 3’मध्ये सैफची मुलगी?

मुंबई : बॉलिवूडमधील नवाब सैफअली खान सध्या चर्चेत आहेत. यंदा ते आपल्या लव्ह स्टोरीसाठी नाही तर त्याची लाडकी मुलगी सारा अली खानच्या धमाकेदार कामगिरीमुळे. नुकतेच साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री करत सर्वांना वेड लावले आहे, तर डिसेंबर महिन्यात प्रदर्शन होणाऱ्या ‘सिंबा’ चित्रपाटतही साराची भूमिका सर्वांना मोहात पाडणारी आहे. या चित्रपटाच्या गाण्यामधून साराने आपल्या डान्सची …

‘बागी 3’मध्ये सैफची मुलगी?

मुंबई : बॉलिवूडमधील नवाब सैफअली खान सध्या चर्चेत आहेत. यंदा ते आपल्या लव्ह स्टोरीसाठी नाही तर त्याची लाडकी मुलगी सारा अली खानच्या धमाकेदार कामगिरीमुळे. नुकतेच साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री करत सर्वांना वेड लावले आहे, तर डिसेंबर महिन्यात प्रदर्शन होणाऱ्या ‘सिंबा’ चित्रपाटतही साराची भूमिका सर्वांना मोहात पाडणारी आहे. या चित्रपटाच्या गाण्यामधून साराने आपल्या डान्सची झलक चाहत्यांनी दिली आहे.

या प्रसिद्धीनंतर सारा खानला आता साजिद नाडियावालातर्फे चित्रपट ‘बागी 3’ साठी विचारण्यात आलं आहे. बागी 2 बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता आणि यामुळेच आता या चित्रपटासाठी साराला कास्ट करणार असल्याचे बोललं जात आहे. केदारनाथ आणि सिंबा चित्रपटातील अभिनयाने साराचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे.

बागी 3 चित्रपटासाठी सारा या प्रोजेक्टचा भाग बनणार का नाही अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे की, सारा ही ऑफर स्वीकारेल. साराच्या कामगिरीमुळे सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय आणखी काही नवीन प्रोजेक्टसाठी साराला ऑफर आल्या आहेत असंही सांगितलं जात आहे.

सैफअली खान आणि अमृता सिंहची मुलगी साराने कमी वेळात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग तयार झालेला आहे. येत्या 28 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या सिंबा चित्रपटात ती रणवीर सिंहसोबत दिसणार आह.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *