अष्टपैलू सतीश राजवाडेकडे 'स्टार प्रवाह'ची नवी जबाबदारी!

मुंबई: मुंबई-पुणे- मुंबईसह अनेक प्रसिद्ध मराठी सिनेमांचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे नव्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड अर्थात कार्यक्रम प्रमुख म्हणून ते नवी जबाबदारी सांभाळणार आहेत. सतीश राजवाडेंसारखा अभिनेता, दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक असं अष्टपैलू व्यक्तीमत्व ही जबाबदारी सांभाळणार असल्याने, स्टार प्रवाहवर नक्कीच नवे प्रयोग पाहायला मिळतील अशी आशा …

अष्टपैलू सतीश राजवाडेकडे 'स्टार प्रवाह'ची नवी जबाबदारी!

मुंबई: मुंबई-पुणे- मुंबईसह अनेक प्रसिद्ध मराठी सिनेमांचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे नव्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड अर्थात कार्यक्रम प्रमुख म्हणून ते नवी जबाबदारी सांभाळणार आहेत. सतीश राजवाडेंसारखा अभिनेता, दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक असं अष्टपैलू व्यक्तीमत्व ही जबाबदारी सांभाळणार असल्याने, स्टार प्रवाहवर नक्कीच नवे प्रयोग पाहायला मिळतील अशी आशा प्रेक्षकांना आहे. येत्या दोन दिवसात सतीश राजवाडे पदभार सांभाळतील.

सतीश राजवाडे  यांनी स्वत: असंभव,अग्निहोत्र,गुंतता हृदय हे, एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या जबरदस्त मालिकांचं दिग्दर्शन केलं होतं. या मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

दुसरीकडे सतीश राजवाडेंचे मुंबई-पुणे-मुंबईचे तीनही भाग, प्रेमाची गोष्ट, मृगजळ एक डाव धोबीपछाड,गैर,बदाम राणी गुलाम चोर,पोपट,सांगतो ऐका, मुंबई दिल्ली मुंबई (हिंदी चित्रपट) हे सिनेमेही प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेले. त्यामुळे आता सतीश राजवाडे नव्याने प्रेक्षकांची मालिकांची अपेक्षा कसं पूर्ण करतो हे पाहावं लागेल.

सतीश राजवाडेचा अनुभव दांडगा आहे. त्याची कल्पनाशक्ती उत्तम आहे. त्यामुळे तो नवी जबाबदारी उत्तमरित्या पेलेल यात शंका नाही. सतीश राजवाडेच्या नव्या इनिंगला टीव्ही 9 मराठी डिजीटल टीमकडून खूप खूप शुभेच्छा!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *