BIG News : सेबीचा शिल्पा शेट्टी राज कुंद्राला दणका, 3 लाखांचा दंड ठोठावला, नेमकं कारण काय?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांकडून राज कुंद्रा यांची चौकशी सुरु आहे. दुसरीकडे शिल्पा शेट्टी हिच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

BIG News : सेबीचा शिल्पा शेट्टी राज कुंद्राला दणका, 3 लाखांचा दंड ठोठावला, नेमकं कारण काय?
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 29, 2021 | 12:08 AM

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांकडून राज कुंद्रा यांची चौकशी सुरु आहे. दुसरीकडे शिल्पा शेट्टी हिच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. सेबीनं शिल्पा शेट्टीला 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या वियानं इंडस्ट्रीजनं सेबीच्या इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं हा दंड लावण्यात आला आहे.

एकीकडं शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला मुंबईतील न्यायालयानं 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सेबीनं आज राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात कारवाई केली आहे. सेबीनं हा दंड वियान इंडस्ट्रीजनं सेबीच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं लावला आहे. यानिमित्तानं शिल्पा शेट्टी हिच्या समोर आणखी एक संकट उभं राहिल्याचं बोललं जात आहे.

शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांची चौकशी होणार

पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या उद्योगपती राज कुंद्रा यांचे बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे. गुन्हे शाखेच्या मते, कंपनीशी संबंधित राज कुंद्रा , शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलवण्यात आलं आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.

या अधिकाऱ्यानं सांगितलं की, कुंद्रा यांचे बँक खाते आणि विवान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यात शिल्पा शेट्टी दिग्दर्शक होत्या, याचीही चौकशी सुरु आहे. ही कंपनी कथित पॉर्न फिल्म प्रकरणाच्या मध्यभागी आहे. ते म्हणाले की, कुंद्राकडे अशी अनेक बँक खाती आहेत ज्यात परदेशातून पैसे जमा होते. या अधिकाऱ्यानं सांगितले की, शेट्टी यांनी संचालित केलेल्या कोणत्याही बँक खात्यातील व्यवहारांची माहिती आतापर्यंत तपासकार्यांच्या निदर्शनास आलेली नाही, सोबतच ‘हा तपासाचा भाग असल्यानं खात्यांची तपासणी केली जात आहे, त्यामुळे शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. मात्र, आम्ही कोणाच्याही वैयक्तिक खात्यांशी संबंधित नाही.’ 19 जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेनं अश्लील चित्रपट बनवून अॅपच्या माध्यमातून शेअर केल्याच्या आरोपाखाली कुंद्राला अटक केली होती.

इतर बातम्या

Rashmi Desai : टीव्हीवरील सुसंस्कृत सून रश्मी देसाईचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

Bigg Boss OTT | सलमान खानच्या शोमध्ये रंगणार धमाल, टीव्ही विश्वातील प्रसिद्ध ‘बहू’ बनणार ‘बिग बॉस’चा हिस्सा!

SEBI imposes a penalty of Rs 3 lakhs on actor Shilpa Shetty and her husband Raj Kundra Viaan Industries for violation of rules

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें