शाहरुखचा मुलगा लंडनमधील 'या' मुलीच्या प्रेमात

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यामध्ये काही महिला चाहत्यांकडून शाहरुखचे नेहमीच कैतुकही केले जाते. तर काहीजण शाहरुखवर एकतर्फी प्रेमही करतात. आता यामध्ये शारुखचा मुलगा आर्यन खानच्या (Aaryan khan) नावाचाही समावेश झाला आहे.

शाहरुखचा मुलगा लंडनमधील 'या' मुलीच्या प्रेमात

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यामध्ये काही महिला चाहत्यांकडून शाहरुखचे नेहमीच कैतुकही केले जाते. तर काहीजण शाहरुखवर एकतर्फी प्रेमही करतात. आता यामध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानचाही (Aaryan khan) समावेश झाला आहे. आर्यनही (Aaryan khan) एका मुलीच्या प्रेमात पडल्याचे सांगितलं जात आहे. अभ्यासासाठी लंडनमध्ये असलेला आर्यन सध्या लंडनमधल्या एका ब्लॉगरसोबत डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

Another sweet picture from AbRam’s birthday party… #fathersloveoverload

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

आर्यन खान डेट करत असलेलल्या मुलीला शाहरुखची पत्नी गौरी खानही भेटली असल्याचे म्हटलं जात आहे. नुकतेच सोशल मीडियावर आर्यनचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन मोठ्या प्रमाणात आर्यनच्या प्रेम प्रकरणावरुन चर्चा सुरु आहे. मात्र या फोटोमधील मुलगी आणि आर्यन डेट करत असलेली मुलगी ही एकच आहे का याबद्दल अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 

View this post on Instagram

 

Little one was a bit confused between ‘Boating’ and Voting, so took him along to experience the difference.

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

सध्या शाहरुख आणि त्याचे कुटंब मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत होते. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये शाहरुख खान, पत्नी गौरी, मुलगा आर्यन, अब्राहम आणि मुलगी सुहाना खान दिसत होती. स्वत: शाहरुखनेही सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhana.khan2_) on

आर्यन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असलयाचे बोललं जात आहे. पण एखाद्या चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी त्याने ‘द लायन किंग’ या हिंदी व्हर्जन चित्रपटासासठी डबिंग केलं आहे. तर शाहरुखनेही या चित्रपटात ‘मुफासा’ या भूमिकेसाठी आपला आवाज दिला आहे. भारतात हा चित्रपट काल (19 जुलै) प्रदर्शित झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *