शाहरुख-सलमान एकत्र, झीरोचं नवं गाणं रिलीज

मुंबई : शाहरुख खानचा नवा चित्रपट झीरोचं नवीन गाणं इश्कबाजी प्रदर्शित झालं आहे. चाहता वर्ग बऱ्याच दिवसांपासून या गाण्याची वाट पाहत होता, याचे कारणही खास आहे. बऱ्याच कालांतराने बॉलीवूडचा किंग खान आणि दबंग सलमान खान या गाण्याच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. यामुळे हे गाणं पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. झीरो चित्रपटाचं नवीन गाणं ‘इश्कबाजी’ खूपच …

मुंबई : शाहरुख खानचा नवा चित्रपट झीरोचं नवीन गाणं इश्कबाजी प्रदर्शित झालं आहे. चाहता वर्ग बऱ्याच दिवसांपासून या गाण्याची वाट पाहत होता, याचे कारणही खास आहे. बऱ्याच कालांतराने बॉलीवूडचा किंग खान आणि दबंग सलमान खान या गाण्याच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. यामुळे हे गाणं पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
झीरो चित्रपटाचं नवीन गाणं ‘इश्कबाजी’ खूपच शानदार आहे. या गाण्यामध्ये सलमानची दमदार एंट्री दाखवत, शाहरुख सलमानच्या समोर नाचत आहे. यामध्ये शाहरुख सलमानच्या ‘जीने के है चार दिन’ या आयकॉनिक गाण्यावर स्टेप करताना दिसत आहे. तसेच सलमानही याच गाण्यामधील स्टेपवर नाचत आहे.
नुकतेच या चित्रपटाचं गाणं ‘मेरे नाम तू’ प्रदर्शित झाले होते. या गाण्यालाही चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आनंद एल. राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या 21 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुख खान सोबत अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ  प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
पाहा झिरो चित्रपटाचे हे गाणं

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *