जगातील सर्वात उंच इमारतीत घर खरेदी, अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या घराची किंमत किती?

अभिनेत्री शर्लिन चोप्राने नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वत: ला बुर्ज खलिफामध्ये एक सुंदर अपार्टमेंट गिफ्ट केले आहे.शर्लिन चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची बातमी जाहीर केली.

Sherlyn Chopra apartment in Burj Khalifa, जगातील सर्वात उंच इमारतीत घर खरेदी, अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या घराची किंमत किती?

दुबई : जगातील सर्वात उंच इमारतीच्या यादीत दुबईतील बुर्ज खलिफाचा पहिला नंबर लागतो. जगातील श्रीमंत व्यक्तींना बुर्ज खलिफासारख्या इमारतीत आपलं घर असावं अशी इच्छा असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दुबईमध्ये भव्य आणि सुंदर दिसणाऱ्या इमारतीत स्वतःचे घर घेतले आहे. या यादीत सुपरहॉट आणि आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या (Sherlyn Chopra apartment in Burj Khalifa) नावाचा समावेश झाला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वत: ला बुर्ज खलिफामध्ये एक सुंदर अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. (Sherlyn Chopra apartment in Burj Khalifa)

शर्लिन चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची बातमी जाहीर केली. शर्लिनचं घर सर्व सुविधांसह अतिशय भव्य आणि सुंदर आहे.  शर्लिन चोप्रा लवकरच मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे.

शर्लिनने बुर्ज खलिफामध्ये घर घेतल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिली. “दुबईत राहणाऱ्या माझ्या एका मित्राने मला दुबईत बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. माझं नेहमीच स्वप्न होतं की मी जिथे नेहमी जाते तिथे माझं स्वत:चं घर असावं. दुबई माझ्या सर्वाधिक पसंतीचं शहर आहे”, असं शर्लिन म्हणाली.

 

View this post on Instagram

 

#curvilicious ? Trainer matters! @yougessh ?

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हा फोटो सुद्धा तिने बुर्ज खलिफामध्येच क्लिक केला आहे. शर्लिनच्या फ्लॅटबाहेरचाच हा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.

 

View this post on Instagram

 

Earlier today.. ❤️ #bootilicious ?

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिनच्या घराची किंमत?

शर्लिनने बुर्ज खलिफासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी मोठी रक्कम दिली आहे. अन्य वेबसाईटवरील माहितीनुसार बुर्ज खिलामध्ये 2BHK घराची किंमत जवळपास 15 कोटी रुपये आहे. मात्र शर्लिनने हे घर किती रुपयांना घेतलं, याबाबतची माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे शर्लिनच्या घराची किंमत किती, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *