'सिंबा'ने शाहरुखचा रेकॉर्ड तोडला, आतापर्यंत छप्परफाड कमाई

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा अभिनय आणि रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या ‘सिंबा’ सिनेमाने आतापर्यंत छप्परफाड कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस गल्ल्यातून ‘सिंबा’ रोज नवनवीन रेकॉर्ड नोंदवत असताना, आता तर थेट बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचाही रेकॉर्ड तोडला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘चेन्नई …

'सिंबा'ने शाहरुखचा रेकॉर्ड तोडला, आतापर्यंत छप्परफाड कमाई

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा अभिनय आणि रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या ‘सिंबा’ सिनेमाने आतापर्यंत छप्परफाड कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस गल्ल्यातून ‘सिंबा’ रोज नवनवीन रेकॉर्ड नोंदवत असताना, आता तर थेट बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचाही रेकॉर्ड तोडला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाच्या कमाईला ‘सिंबा’ने मागे टाकलं आहे.

2013 साली शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाने तीन आठवड्यात 227.13 कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे, रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर-साराच्या अभिनयाने साकारलेल्या ‘सिंबा’ने केवळ 12 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

‘सिंबा’ सिनेमाने 200 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा पार केला आहे. 200 कोटींच्या कमाईचा टप्पा पार करणाऱ्या ‘सिंबा’च्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित हा तिसरा सिनेमा ठरला आहे. प्रदर्शनापासून ‘सिंबा’ने आतापर्यंत 227.71 कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्स्प्रेस, गोलमाल अगेन या सिनेमांनीही 200 कोटींचा टप्पा पार केला होता.

रणवीर सिंहची नव्या वर्षाची सुरुवात दमदार झाली आहे. ‘सिंबा’च्या निमित्ताने रणवीर सिंहचा हा सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला असून, सारा अली खानसाठी सिनेमा खास ठरला आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, रोहित शेट्टी दिग्दर्शित सलग आठवा सिनेमा असा आहे, ज्याने 100 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा पार केला आहे.

‘सिंबा’ हा तेलुगू सिनेमा ‘टेम्पर’ यावर आधारित असून, त्याच सिनेमचा हिंदी रिमेक आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ज्युनिअर एनटीआरने ‘टेम्पर’ सिनेमात मुख्य भूमिका निभावली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *