Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हा म्हणतेय, 10 वर्षांत पहिल्यांदाच एवढी मोठी विश्रांती घेतली…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओळखली जाते. सोनाक्षी सतत काहींना काही कामात व्यस्त असते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे सोनाक्षीने 10 वर्षांत पहिल्यांदाच एवढी मोठी विश्रांती घेतली आहे.

Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हा म्हणतेय, 10 वर्षांत पहिल्यांदाच एवढी मोठी विश्रांती घेतली...
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 12:04 PM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओळखली जाते. सोनाक्षी सतत काहींना काही कामात व्यस्त असते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे सोनाक्षीने 10 वर्षांत पहिल्यांदाच एवढी मोठी विश्रांती घेतली आहे. सोनाक्षी म्हणते की, 10 वर्षांपासून मी सतत काम करते आहे. एवढया मोठ्या विश्रांतीची मला सवय देखील नाही. सोनाक्षी कोरोनाच्या अगोदर एका वेब सीरीजमध्ये काम करत होती. सोनाक्षी सिन्हा सध्या दिग्दर्शक रिमा कागती यांच्याबरोबर काम करत आहे. तिच्या काही चित्रपटांच्या शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे सोनाक्षी सिन्हा सध्या सेटवर परतण्यास उत्सुक आहे.(Sonakshi Sinha warking 10 years non stop but corona stop warking)

अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेपार्ह शब्दात कमेंट करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. शशिकांत गुलाब जाधव असं त्याचे नाव होते. त्याने सोनाक्षीसह बॉलिवूडच्या इतर कलाकारांबाबतही वादग्रस्त कमेंट केली होती. याप्रकरणी सोनाक्षीने मुंबई पोलिसांकडे 7 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर महिला सुरक्षा, सायबर या विषयांशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमार्फत तिने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस’ अशी मोहिम सुरु होती. मात्र, तिच्या व्हिडीओवर शशिकांत जाधवने आक्षेपार्ह कमेंट केली. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर देशभरातील सुशांतचे चाहते न्यायाची मागणी करत आहेत. बॉलिवूडवर परिवारवादाचा आरोपही झाला. यानंतर स्टार किड्सवर देखील सडकून टीका झाली आणि ट्रोलही करण्यात आलं. अशास्थितीत अनेक सेलिब्रेटी ट्विटरवरील या ट्रोलिंगपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच सोनाक्षी सिन्हाने ट्विटरला अलविदा केला आहे. सोनाक्षी सिन्हाने ट्विट करत आपण ट्विटर सोडत असल्याचं सांगितलं. तिने म्हटलं आहे, “जर मानसिक आरोग्य सांभाळायचं असेल आणि आपला विवेक शाबूत ठेवायचा असेल, तर त्याची पहिली पायही नकारात्मकतेपासून दूर राहणे हीच आहे. सध्या ट्विटरवर इतकी नकारात्मकता कुठेच नाही. त्यामुळेच मी माझं ट्विटरचं खातं बंद करत आहे.”

संबंधित बातम्या : 

सोनाक्षी सिन्हासह सलमान खानच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्तीचाही ट्विटरला ‘बायबाय’

सोनाक्षी सिन्हा 24 लाख रुपये घेऊनही स्टेज शोला आलीच नाही, फसवणुकीचा गुन्हा दाखल

(Sonakshi Sinha warking 10 years non stop but corona stop warking)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.