कपूर कुटुंबाच्या लेकीसोबत सिनेमागृहात गैरवर्तन ; ज्यामुळे ‘ती’ प्रचंड घाबरली आणि…

सिनेमागृहात कपूर कुटुंबातील लेकीसोबत असं काय घडलं, ज्यामुळे ती प्रचंड घाबरली ; अखेर अनेक वर्षांनंतर ती धक्कादायक घटना समोर आलीच

कपूर कुटुंबाच्या लेकीसोबत सिनेमागृहात गैरवर्तन ; ज्यामुळे 'ती' प्रचंड घाबरली आणि...
सोनम कपूर
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 1:25 PM

मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसोबत असे अनेक किस्से घडले, जे अनेक वर्षांनंतर समोर आले. असे धक्कादायक किस्से समोर आल्यानंतर कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर कुटुंबाच्या लेकी सोबत देखील एक अशी घडली, जी अनेक वर्षांनंतर समोर आली आहे. अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिने तिच्या आयुष्यातील एका घटनेचा खुलासा मुलाखतीत (Sonam Kapoor Interview) केला. एका शोदरम्यान अभिनेत्रीने लहानपणी लैंगिक शोषणाचा शिकार झाल्याचं सांगितलं होतं. जेव्हा अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला, तेव्हा प्रत्येकाला मोठा धक्का बसला.

सोनम कपूर हिने (Sonam Kapoor Movies) राजीव मसंद यांच्या ‘द एक्ट्रेसेस राउंडटेबल’ (2016) शोमध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितलं. सोनम कपूर म्हणाली, जेव्हा ती फक्त १३ वर्षांची होती, तेव्हा मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गेली. सिनेमागृहात असलेल्या अंधाराचा फायदा घेत एका व्यक्तीने सोनमवर लैंगिक शोषण केले.

हे सुद्धा वाचा

अज्ञात व्यक्तीने गैरवर्तन केल्यानंतर अभिनेत्री प्रचंड घाबरली. तेव्हा सोनम फार लहान अल्यामुळे आपल्यासोबत काय होत आहे. हे अभिनेत्रीला कळत नव्हातं. सोनम कपूर हिने जेव्हा राजीव मसंद यांच्या शोमध्ये लहानपणी तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला.

जेव्हा सोनमने सिनेमागृहात घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा त्याठिकाणी राधिका आपटे (Radhika Apte), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि विद्या बालन (Vidya Balan) यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. सोनम कायम तिच्य आयुष्यातील महत्त्वाच्या घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या सोनम कपूर मुलगा वायू याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. गेल्या वर्षी सोनम हिने गोंडस मुलाला जन्म दिला. सोनम कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण अद्याप अभिनेत्रीने मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. अभिनेत्रीने लेकासाठी नो फोटो पॉलिसी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

सोनम सध्या अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर सोनम कायम सक्रिय असते. अनेक सिनेमांच्या माध्यामतून चाहत्यांचं मनोरंजन करणारी सोनम आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोनम कपूरने 2018 साली मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. एवढंच नाही तर, आता देखील सोनम आणि आनंद एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.