कधी-कधी पाकिस्तानात जाऊन रहावं वाटतं, तिथे खुश राहिन : सोनी राजदान

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान सध्या त्यांचा आगामी सिनेमा ‘नो फादर्स इन काश्मीर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमादरम्यान काश्मीर आणि पाकिस्तानसंबंधी अनेक मुद्यांवर सोनी राजदान यांनी आपलं मतं उघडपणे मांडली. “कधी-कधी मला वाटतं की मला पाकिस्तानात जाऊन राहायला हवं”, असे त्या म्हणाल्या. “मी जेव्हाही काश्मीरच्या मुद्यावर बोलते तेव्हा मला …

कधी-कधी पाकिस्तानात जाऊन रहावं वाटतं, तिथे खुश राहिन : सोनी राजदान

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान सध्या त्यांचा आगामी सिनेमा ‘नो फादर्स इन काश्मीर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमादरम्यान काश्मीर आणि पाकिस्तानसंबंधी अनेक मुद्यांवर सोनी राजदान यांनी आपलं मतं उघडपणे मांडली. “कधी-कधी मला वाटतं की मला पाकिस्तानात जाऊन राहायला हवं”, असे त्या म्हणाल्या.

“मी जेव्हाही काश्मीरच्या मुद्यावर बोलते तेव्हा मला ट्रोल करण्यात येतं. जर मी पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्यावर बोलते तर मला देशद्रोही समजलं जातं. मला असं वाटतं की, काश्मीर आणि पाकिस्तानमधील संस्कृती समन्वय संपला आहे. मला देशद्रोही म्हटलं जातं. लोक मला पाकिस्तानला पाठवण्याची भाषा करतात”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“कधी-कधी मी विचार करते की, हो, मला पाकिस्तानात जाऊन राहायला हवं. मी तिथे आनंदात राहिलं. तिथे जेवणही फार चांगलं मिळतं. इथे तर लोक मला पळवायच्या मागे लागले आहेत. अनेकदा लोकांनी मला पाकिस्तानात जाऊन राहाण्याचा सल्लाही दिला. पण माझ्यासारखे विचार करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे कोण काय म्हणतं, मला यापासून काहीही फरक पडत नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

‘नो फादर्स इन काश्मीर’ या सिनेमामध्ये सोनी राजदान यांच्यासोबतच अभिनेता कुलभूषण खरबंदा, अंशूमन झा, जारा वेब, अश्विन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं शूटिंग काश्मीरमध्ये झालं आहे. या सिनेमाची कहाणी दोन 16 वर्षीय मुलांच्या जीवनावर आधारित आहे. येत्या 5 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : ‘नो फादर्स इन काश्मीर’चा ट्रेलर

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *