सोनू निगमला नेमकं काय झालं?

सोनू निगमला नेमकं काय झालं?

मुंबई : गायक सोनू निगमने आपले आजारपणातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका अॅलर्जीमुळे सोनू निगमची तब्येत खराब झाली होती आणि त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता सोनू निगमची तब्येत ठिक आहे. याबाबतची माहिती सोनूने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आजारपण आणि तब्येतीबद्दल सांगितलं आहे.

सोनू निगमने सोशल मीडियावर आपले दोन फोटो शेअर केले आहेत. त्याने फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, तुमच्या सर्वांचे प्रेम मिळाले, त्याबद्दल खूप धन्यवाद. काल रात्री मी ओदिशावरुन एका कॉन्सर्ट शोवरुन परतलो आहे. मला आता काही हरकत नाही तुम्हाला माझ्या आजारपणाबाबत सांगायला, आजच्यापेक्षा आधी माझी तब्येत कशी होती त्याबद्दल, कारण यामधून आपल्या सर्वांना शिकायला मिळेल. मला सी फूडमुळे अॅलर्जी झाली होती. जर मी वेळेत रुग्णालयात गेलो नसतो, तर जास्त त्रास झाला असता. कोणत्याही अॅलर्जीकडे दुर्लक्ष करणं चुकीचंच आहे. सर्वांना आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा.

सोनू निगमने दोन फोटो शेअर केले आहेत. एकामध्ये त्याचे डोळे सुजले आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो रुग्णालयातील बेडवर झोपलेला दिसत आहे. तिथे पोहचल्यावर डॉक्टरने त्याला आयसीयूमध्य दाखल होण्याचा सल्ला दिला होता.

सोनू निगम नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सोनू निगमच्या जवळ येतो आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. चालता चालता तो सोनूच्या खांद्यावर हात ठेवतो, सोनू त्याचा हात पकडून मुरडतो आणि यानंतर सोनू त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसतो. यावेळी सर्व लोक थोड्यावेळासाठी आश्चर्यचकीत होतात. मात्र सोनू आपल्या चाहत्याची मस्करी करत होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *