रजनीकांतच्या सिनेमाचं अनोखं प्रमोशन, विमानावर ‘दरबार’ सिनेमाचं पोस्टर

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांतचा लवकरच नवा सिनेमा येत आहे. रजनीकांतच्या नव्या सिनेमाचं नाव 'दरबार' (Rajanikant Darbar movie promotion) आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:14 PM, 2 Jan 2020
रजनीकांतच्या सिनेमाचं अनोखं प्रमोशन, विमानावर 'दरबार' सिनेमाचं पोस्टर

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांतचा लवकरच नवा सिनेमा येत आहे. रजनीकांतच्या नव्या सिनेमाचं नाव ‘दरबार’ (Rajanikant Darbar movie promotion) आहे. रजनीकांतचा प्रत्येक सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची जोरादार चर्चा चाहत्यांमध्ये सुरु असते. यंदाही दरबार सिनेमाची चर्चा सुरु आहे. याचे कारण असे की, दरबार सिनेमाचं प्रमोशन विमानावर पोस्टर (Rajanikant Darbar movie promotion) लावून करण्यात आलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता लागली आहे. येत्या 9 जानेवारीला दरबार सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांतच्या प्रत्येक सिनेमात अॅक्शन आणि स्टाईल असते. त्यामुळे रजनीकांतचे चाहते त्याचे प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात. रजनीकांतचा प्रत्येक सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची जोरदार चर्चाही सुरु असते.

रजनीकांतच्या दरबार सिनेमाच्या प्रमोशनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विमानावर दरबार सिनेमाचं पोस्टर लावण्यात आलं आहे. ज्यामध्ये रजनीकांतचा फोटो दिसत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी चार विमानं बूक करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

यापूर्वीही रजनीकांतच्या ‘कबाली’ सिनेमाचा पोस्टर संपूर्ण विमानावर दिसला होता. कबाली सिनेमासाठी त्यांच्या सिनेमाचा ऑफिशिअल एअरलाइन पार्टनर एअर अशिया इंडियाने एक स्पेशल विमान या सिनेमासाठी दिले होते.

दरबार सिनेमाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉस यांनी केले आहे. हा सिनेमा चार भाषा हिंदी, मल्याळम, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रजनीकांतशिवाय नयनतारा, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, निवेथा थॉमस आणि योगी बाबू प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.