साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जुनने खरेदी केली 7 कोटींची कार

बॉलिवूडनंतर देशात सर्वाधिक दाक्षिणात्य चित्रपट पाहिले जातात. सध्या या चित्रपटाच्या प्रेक्षकातही वाढ झाली आहे. अॅक्शन सिनमुळे दाक्षिणात्या चित्रपट प्रसिद्ध आहेत.

साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जुनने खरेदी केली 7 कोटींची कार
Follow us
| Updated on: Jul 06, 2019 | 11:28 AM

हैदराबाद : बॉलिवूडनंतर देशात सर्वाधिक दाक्षिणात्य चित्रपट पाहिले जातात. सध्या या चित्रपटाच्या प्रेक्षक वर्गातही वाढ झाली आहे. अॅक्शन सिनमुळे दाक्षिणात्य चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याने सर्व देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याने 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 7 कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. या कारचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याच्या या नव्या कारमुळे पुन्हा एकदा अल्लू अर्जून चर्चेत आला आहे.

सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमारसारखे बडे स्टार बॉलिवूडमध्ये असूनही कुणी इतकी महागडी कार खरेदी केलेली नाही. देशातील सर्वात महागडी कार खरेदी करणारा पहिला अभिनेता म्हणून अल्लू अर्जुन आहे, असं म्हटलं जात आहे.

नुकतेच अल्लू अर्जूनने ‘पेरु सुर्या’ आणि ‘ना इल्लू इंडिया’ चित्रपटात काम केले होते. यामध्ये त्याने एका सैन्याच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

या 7 कोटींच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अनेक लग्झरी फीचर दिलेले आहेत. रेड्डी कस्टम्सने व्हॅनला स्पेशली कस्टमाइज आणि त्याचे डिझाईन तयार केले आहे. या व्हॅनमधील एक्सटीरिअर पाहिले, तर इथे अल्लू अर्जुनचे नाव AAअसं कोरलं आहे.

या व्हॅनिटी व्हॅनला भारतातील बेन्ज चौसीवर तयार केले आहे. यावर तयार केलेले वाहन सर्वाधिक काळ टिकतात, असं म्हटलं जाते. अल्लूने आपल्या इन्स्टग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे फोटो व्हायरल होत आहे.

फोटो शेअर करताना अल्लूने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “लोकांनी मला खूप प्रमे दिले आणि त्यांच्या प्रेमामुळे मी ही कार खरेदी करु शकलो. सर्वांचे खूप आभार, ही माझी व्हॅनिटी व्हॅन आहे, या व्हॅनचे नाव फॉल्कलन ठेवले आहे”.

अल्लू अर्जन सध्या ‘टायटल AA19’  चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनीवास करत आहेत. अल्लू अर्जूनसोबत या चित्रपटात पूजा हेगडे दिसणार आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.