के. एल. राहुलकडून आथिया सोबतचा फोटो पोस्ट, मुलीच्या फोटोवर सुनील शेट्टीची 'ही' कमेंट

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि इंडियन क्रिकेटर के. एल राहुलच्या रिलेशनशिपची (Sunil Shetty comment on Athiya shetty and K L Rahul photo) नेहमीच चर्चा सुरु असते.

के. एल. राहुलकडून आथिया सोबतचा फोटो पोस्ट, मुलीच्या फोटोवर सुनील शेट्टीची 'ही' कमेंट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि इंडियन क्रिकेटर के. एल राहुलच्या रिलेशनशिपची (Sunil Shetty comment on Athiya shetty and K L Rahul photo) नेहमीच चर्चा सुरु असते. मात्र दोघांनी अद्याप उघडपणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पुन्हा या दोघांचे रिलेशनशिप असल्याचे समोर आले आहे. याचे कारण सोशल मीडियावरील पोस्ट (Sunil Shetty comment on Athiya shetty and K L Rahul photo) आहे.

के एल राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अथियासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोघे एका फोन बूथमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करताना के. एल. राहुलने ‘हॅलो, देवी प्रसाद….’, असं कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Hello, devi prasad….?

A post shared by KL Rahul? (@rahulkl) on

अथिया फोटोमध्ये हसताना दिसत आहे. तर के. एल. राहुल गंभीर दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर क्रिकेटर हार्दिक पंड्याने कमेंट करत म्हटले, टू क्यूटीज. या फोटोवर अथियाचे वडील आणि बॉलिवूड स्टार अभिनेता सुनील शेट्टीनेही लाफिंग इमोजीसह कमेंट केली आहे. के. एल. राहुलच्या या पोस्टवर त्याचे चाहतेही वेगवेगळ्या कमेंटर करत आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर अथियाचा लहान भाऊ अहान शेट्टीनेही कमेंट केली आहे.

के. एल. राहुलच्या पोस्टनंतर आता पुन्हा या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता यावर हे दोगेही काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, अथिया ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *