इंजिनिअर पदासाठी सनी लिओनीचा अर्ज

पाटणा : बिहारमधील आरोग्य मंत्रालयाच्या लोक स्वास्थ्य अभियंत्रण (पीएचईडी) विभागात कनिष्ठ अभियंतेपदासाठी भरती केली जात आहे. ही भरती ऑनलाईन करण्यात येत असून, वेबपोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले जात आहेत. यात ‘सनी लिओनी’ पहिल्या अर्जदारांमध्ये आहे. यावरुन आता सोशल मीडियासह बिहारच्या राजकाणातही ‘गरमा गरम’ चर्चा सुरु झाली आहे. मात्र, बिहार आरोग्य खात्याच्या यादीतील अर्जदार अभिनेत्री सनी लिओनी …

sunny leone, इंजिनिअर पदासाठी सनी लिओनीचा अर्ज

पाटणा : बिहारमधील आरोग्य मंत्रालयाच्या लोक स्वास्थ्य अभियंत्रण (पीएचईडी) विभागात कनिष्ठ अभियंतेपदासाठी भरती केली जात आहे. ही भरती ऑनलाईन करण्यात येत असून, वेबपोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले जात आहेत. यात ‘सनी लिओनी’ पहिल्या अर्जदारांमध्ये आहे. यावरुन आता सोशल मीडियासह बिहारच्या राजकाणातही ‘गरमा गरम’ चर्चा सुरु झाली आहे. मात्र, बिहार आरोग्य खात्याच्या यादीतील अर्जदार अभिनेत्री सनी लिओनी नाहीय, तर कुणीतरी बनावट अर्ज दाखल केला आहे.

पीएचईडीच्या ड्राफ्ट मेरिट लिस्टमध्ये बनावट अर्जदार सनी लिोनी पहिल्या स्थानावर आहे. स्कोअर बोर्डनुसार, सनी लिओनीला 73.50 एज्युकेशनल पॉईंट, 25.00 एक्स्पीरियन्स पॉईंट मिळाले आहेत. कनिष्ठ अभियंता पदाच्या 214 जागांसाठी 17 हजार जणांनी अर्ज केला आहे. त्यात ‘सनी लिओनी’ नावाच्या बनावट अर्जदारानेही अर्ज केला आहे.

sunny leone, इंजिनिअर पदासाठी सनी लिओनीचा अर्ज

विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खऱ्याखुऱ्या सनी लिओनीनेही ट्वीट केले आहे. ‘हा..हा.. दुसऱ्या सनी लिओनीने इतका चांगला स्कोअर केल्याने मी आनंदी आहे’ असे ट्वीट सनी लिओनीने केले आहे.

बिहारच्या राजकारणातही पडसाद

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील या ‘सनी लिओनी’ प्रकरणाचे पडसाद बिहारच्या राजकारणातही उमटले. बिहारमधील विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरच थेट निशाणा साधला. “नितीश यांचं नकली शिक्षण, नकली डिग्री आणि आता नकली नियुक्त्या” असे म्हणते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. तेजस्वी यांना जनता दल यूनायटेडचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी उत्तर दिले आहे. “तेजस्वी स्वत: दहावी पास नाहीत, त्यांना कसं कळणार कुठल्या परीक्षा किंवा नियुक्त्या?”, असे म्हणत नीरज कुमार यांनी तेजस्वी यांना उत्तर दिले आहे.

बिहारमधील पीएचईडी विभागाच्या संयुक्त सचिवांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, “कनिष्ठ अभियंता पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले गेलो. यात अनेकांनी नकली नावाने अर्ज केले. ऑनलाईन अर्ज प्रक्रियाचा काही जणांनी दुरुपयोग केला. 214 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्जदारांना आपला अनुभव अर्जात भरुन स्कोअर जनरेट करायचा होता. मात्र, नकली नाव, क्रमांक आणि अनुभव भरुन अनेकांनी स्कोअर जनरेट केला आहे. सनी लिओनीच्या नावे करण्यात आलेला अर्ज असाच नकली आहे.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *