गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हृतिक आनंद कुमारांना भेटणार

देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित सुपर 30 हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी 12 जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. गेल्या 3 दिवसात या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हृतिक आनंद कुमारांना भेटणार

पाटणा : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला सुपर 30 चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला असून या चित्रपटात हृतिकने आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे देशभरात चांगले कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या सेलिब्रेशनसाठी उद्या (16 जुलै) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत हृतिक रोशन आपले गुरु आनंद कुमार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाटणामध्ये जाणार आहे

देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित सुपर  30 हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी 12 जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात पाटणाच्या गणितज्ञ आनंद कुमार आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर साकारण्यात आला आहे. आनंद कुमार अशी व्यक्ती आहे, ज्याने गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आयआयटी परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य असल्याचे जगाला दाखवून दिले आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी हृतिकने आनंद कुमार आणि त्यांच्या 30 विद्यार्थ्यांसाठी स्पेशल स्‍क्रीनिंगचे आयोजन केले होते. त्यावेळी आनंद कुमारांनी विद्यार्थ्यांसाठी सुपर 30 बघण्याचा आनंद अनोखा होता असे ट्विट करत आनंद कुमार यांनी केले होते. तसेच त्यांनी या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हृतिकचे आभारही मानले होते.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे तीन दिवस उलटले आहे. मात्र 3 दिवसात या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे. त्याशिवाय आठवडाभरात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील काही रेकॉर्ड ब्रेक करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिकच्या कामाचे प्रेक्षकांसह, कलाकार आणि अनेक दिग्दर्शकांनीही कौतुक केले आहे.

सुपर 30 चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी उद्या हृतिक स्वत: गणितज्ञ आनंद कुमार यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. तसेच उद्या गुरुपौर्णिमाही असल्याने त्याचेच औचित्य साधून हृतिक रोशन आपले गुरु आनंद कुमार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाटणामध्ये जाणार आहे. पाटणामध्ये आनंद कुमार यांच्या घरी जाऊन हृतिक त्यांचा आशीर्वाद घेणार आहे.

संबंधित बातम्या :

 प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ‘सुपर 30’ आॅनलाईन लीक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *