Sushant Singh Rajput | ‘ही जखम लवकर भरणार नाही’, सुशांतच्या बहिणीचे चाहत्यांना भावनिक पत्र

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला हे जग सोडून 5 महिन्यांपेक्षाही अधिक कालावधी झाला आहे. मात्र त्यांच्या असे अचानक जाण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:30 PM, 24 Nov 2020
Shweta Singh Kirti_sushant singh rajput

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला हे जग सोडून 5 महिन्यांपेक्षाही अधिक कालावधी झाला आहे. मात्र त्यांच्या असे अचानक जाण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. याप्रकरणात सुशांतची बहीण ‘जस्टिस फॉर सुशांत’ लीड करताना दिसत आहे. ती सोशल मीडियावर सतत काहीना काहीतरी लिहत असते. अलिकडेच तिने सुशांतच्या फॅन्ससाठी एक भावनिक पत्र लिहले आहे. (Sushant Singh Rajput’s sister’s letter to fans, Sushant Singh Rajput suicide case)

या पत्रात श्वेताने लिहिले आहे की, “मी बर्‍याचदा वाईट काळातून गेले आहे. आणि अजूनही जात आहे. जेव्हा मला असे वाटते की मी आता एक सामान्य आणि नियमित जीवन जगू शकेन तेव्हाच काहीतरी घडते. त्या जखमा लवकर बऱ्या देखील होत नाही. मात्र परिस्थितीत कोणतीही असो धैर्याची आवश्यकता असते.”
पुढे श्वेता लिहते की, ज्या भावाबरोबर मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण घालवला आहे. तो माझा एक अटळ भाग होता. आम्ही एकत्र होतो. आता तो माझ्याबरोबर नाही आणि या गोष्टीची जाणीव होण्यासाठी आणि जगण्यासाठी मला वेळ लागेल. परंतु मला एक गोष्ट स्पष्टपणे माहिती आहे, आणि ती म्हणजे देव येथे आहे. आणि देवावर माझा विश्वास आहे. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही न्यायाविरूद्ध आवाज उठविणे थांबवू उलट आम्ही अधिक शांतपणे आणि सतत प्रयत्न करत राहणार आहोत. रागाने माणसाची उर्जा लवकर नष्ट होते’, असे पत्र सुशांतच्या बहिणीने सुशांतच्या चाहत्यांसाठी लिहले आहे.
सुशांतचा प्रवास
स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.
2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतला डिप्रेशनमध्ये कुणी ढकललं? आतापर्यंत 30 जणांचे जबाब

सुशांत आत्महत्येप्रकरणी ‘खिलाडी’वर गंभीर आरोप, यूट्यूबरविरोधात अक्षय कुमारचा 500 कोटींचा दावा

सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच, त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं? : संजय राऊत

(Sushant Singh Rajput’s sister’s letter to fans, Sushant Singh Rajput suicide case)