‘स्वदेस’फेम ‘कावेरी अम्मा’चं निधन

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेस' चित्रपटात अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांनी साकारलेली 'कावेरी अम्मा'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती

'स्वदेस'फेम 'कावेरी अम्मा'चं निधन
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 12:00 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्वदेस’ चित्रपटात ‘कावेरी अम्मा’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचं निधन (Swades Actress Kishori Ballal Dies) झालं. गेल्या साठ वर्षांपासून किशोरी बल्लाळ यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून किशोरी बल्लाळ आजारी होत्या. त्यांच्यावर बंगळुरुतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 82 वर्षांच्या होत्या. भरतनाट्यम नर्तक एन श्रीपती बल्लाळ हे त्यांचे पती होते.

किशोरी बल्लाळ यांनी 1960 मध्ये कन्नड चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी जवळपास 72 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ चित्रपटात त्यांनी केलेली ‘कावेरी अम्मा’ची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. शाहरुखने साकारलेल्या मोहन भार्गवसाठी मातृतुल्य व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती. बल्लाळ यांनी राणी मुखर्जीसोबत ‘अय्या’, तर दीपिका पदुकोणसोबत लफंगे परिंदे या सिनेमातही काम केलं होतं.

हेही वाचा – सचिनला माझे अंत्यसंस्कार करुदे, प्रख्यात गायिकेची आत्महत्या

आशुतोष गोवारीकरांनी ट्विटरवर पोस्ट लिहित किशोरी बल्लाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “किशोरी बल्लाळ यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झालं आहे. मायाळू आणि प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही कायमस्वरुपी आमच्या स्मरणात राहाल. ‘स्वदेस’मध्ये तुम्ही साकारालेली कावेरी अम्मा अविस्मरणीय आहे. तुमची नेहमी आठवण येईल” असं लिहित गोवारीकरांनी त्यांचा फोटोही शेअर केला आहे.

Swades Actress Kishori Ballal Dies

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.