Tanhaji The Unsung Warrior | नरवीर तानाजींना बॉक्स ऑफिसचा सलाम, पहिल्या दिवसाची कमाई तब्बल…..

महत्त्वाचं म्हणजे या सिनेमासोबत दीपिका पदुकोणचा छपाक आणि रजनीकांतचा दरबार हे दोन सिनेमेही रिलीज झाले होते. मात्र तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवल्याचं चित्र आहे.

Tanhaji The Unsung Warrior | नरवीर तानाजींना बॉक्स ऑफिसचा सलाम, पहिल्या दिवसाची कमाई तब्बल.....
Follow us
| Updated on: Jan 11, 2020 | 6:30 PM

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Tanhaji The Unsung Warrior Box office collection) पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातला आहे. लढवय्या तानाजी मालुसरेंची कथा भव्य पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्याच दिवशी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 16 कोटी रुपयांची कमाई (Tanhaji The Unsung Warrior Box office collection) केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे या सिनेमासोबत दीपिका पदुकोणचा छपाक आणि रजनीकांतचा दरबार हे दोन सिनेमेही रिलीज झाले होते. मात्र तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवल्याचं चित्र आहे. छपाक सिनेमाने पहिल्या दिवशी अवघी 4.77 कोटी रुपयांची कमाई केली.

‘तान्हाजी’ हा सिनेमा मराठमोळा दिग्दर्शित ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगणच्या करियरमधील हा शंभरावा सिनेमा आहे.

ट्रेड अनालिस्ट तरन आदर्श यांनी ट्विट करुन दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे दिले. “पहिल्या दिवशी तान्हाजी सिनेमाने 15.10 कोटी रुपयांची कमाई केली. कमाईचे आकडे दुपारनंतर वाढत गेले. सकारात्मक प्रतिक्रियांमुळे हा सिनेमा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार-रविवारी आणखी मोठी कमाई करेल” असं तरन आदर्श म्हणाले.

दुसरीकडे दीपिकाच्या छपाकने 4.77 कोटी रुपयांची कमाई केली. सन्मानजनक कमाईसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हे आकडे वाढणे गरजेचे आहे, असं तरन आदर्शने म्हटलं आहे.

कोणत्या सिनेमाला किती स्क्रीन?

तान्हाजी हा सिनेमा एकूण 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. यामध्ये भारतात 3880 तर परदेशात 660 स्क्रीन्सचा समावेश आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत 2D आणि 3D मध्ये रिलीज झाला आहे.

दुसरीकडे छपाक हा भारतात 1700 तर परदेशात 460 अशा एकूण 2160 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.