Tanhaji The Unsung Warrior | नरवीर तान्हाजींची झेप, चौथ्या दिवसाची कमाई तब्बल….

अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर (Tanhaji The Unsung Warrior Box office collection) या सिनेमाची प्रेक्षकांवर भुरळ कायम असल्याचं दिसतंय.

Tanhaji The Unsung Warrior | नरवीर तान्हाजींची झेप, चौथ्या दिवसाची कमाई तब्बल....
Follow us
| Updated on: Jan 14, 2020 | 12:12 PM

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर (Tanhaji The Unsung Warrior Box office collection) या सिनेमाची प्रेक्षकांवर भुरळ कायम असल्याचं दिसतंय. कारण अवघ्या तीन दिवसात 60 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या सिनेमाने (Tanhaji The Unsung Warrior Box office collection) चौथ्या दिवशीही आपली कमाईतील घोडदौड कायम ठेवली आहे. चौथ्या दिवशी या सिनेमाने तब्बल 13.75 कोटी म्हणजे जवळपास 14 कोटी रुपयांची कमाई केली. सोमवार असूनही या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या सिनेमाच्या चार दिवसातील कमाईचा आकडा 75.68 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी कमाईचे आकडे जाहीर केले.

तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.57 कोटी आणि रविवारी 26.08 कोटी असे पहिल्या विकेंडला 61.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामध्ये आता सोमवारी चौथ्या दिवशी 13.75 कोटी रुपयांची भर पडल्याने कमाईचा आकडा 75.68 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  त्यामुळे मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे.

छपाकची कमाई किती?

महत्त्वाचं म्हणजे तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमासोबत दीपिका पदुकोणचा छपाक आणि रजनीकांतचा दरबार हे दोन सिनेमेही रिलीज झाले होते. मात्र तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवल्याचं चित्र आहे. छपाक सिनेमाने पहिल्या दिवशी अवघी 4.77 कोटी रुपयांची कमाई केली होती. छपाकला पहिल्या तीन दिवसात 20 कोटी रुपयांचाही गल्ला जमवण्यात अपयश आलं आहे. छपाकला पहिल्या दिवशी 4.77 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.90 कोटी, तिसऱ्या दिवशी 7.35 कोटी आणि सोमवारी चौथ्या दिवशी अवघे 2.35 कोटी रुपयेच कमावता आले.  छपाकची चार दिवसातील एकूण कमाई 21.37 कोटींवर पोहोचली आहे.

कोणत्या सिनेमाला किती स्क्रीन?

तान्हाजी हा सिनेमा एकूण 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. यामध्ये भारतात 3880 तर परदेशात 660 स्क्रीन्सचा समावेश आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत 2D आणि 3D मध्ये रिलीज झाला आहे.

दुसरीकडे छपाक हा भारतात 1700 तर परदेशात 460 अशा एकूण 2160 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

(Tanhaji The Unsung Warrior Box office collection)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.