Tanhaji The Unsung Warrior | 'तान्हाजीं'ची घोडदौड, तीन दिवसातील कमाईचे आकडे समोर

अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे.

Tanhaji The Unsung Warrior | 'तान्हाजीं'ची घोडदौड, तीन दिवसातील कमाईचे आकडे समोर

मुंबई :  अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाने तीन दिवसात 60 कोटींचा आकडा पार केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी तीनही दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. यानुसार तान्हाजी सिनेमाने तीन दिवसात मिळून तब्बल 61.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Tanhaji The Unsung Warrior Box office collection)

तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.57 कोटी आणि रविवारी 26.08 कोटी असे पहिल्या विकेंडला 61.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे.

‘तान्हाजी’ हा सिनेमा मराठमोळा दिग्दर्शित ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगणच्या करियरमधील हा शंभरावा सिनेमा आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमासोबत दीपिका पदुकोणचा छपाक आणि रजनीकांतचा दरबार हे दोन सिनेमेही रिलीज झाले होते. मात्र तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवल्याचं चित्र आहे. छपाक सिनेमाने पहिल्या दिवशी अवघी 4.77 कोटी रुपयांची कमाई केली.

छपाकला तीन दिवसात 20 कोटी रुपयांचाही गल्ला जमवण्यात अपयश आलं आहे. छपाकला पहिल्या दिवशी 4.77 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.90 कोटी आणि

कोणत्या सिनेमाला किती स्क्रीन?

तान्हाजी हा सिनेमा एकूण 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. यामध्ये भारतात 3880 तर परदेशात 660 स्क्रीन्सचा समावेश आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत 2D आणि 3D मध्ये रिलीज झाला आहे.

दुसरीकडे छपाक हा भारतात 1700 तर परदेशात 460 अशा एकूण 2160 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

(Tanhaji The Unsung Warrior Box office collection)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *