Anita Date: “जी व्यक्ती अस्तित्वात नाही, जिवंत नाही ती..”, अनिता दातेसमोर चौकटीतील भूमिकेचं आव्हान

फ्रेमच्या चौकटीमधली रमा मालिकेत काय रंजक वळण आणणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल पण ही भूमिका साकारणं किती आव्हानात्मक आहे याबद्दल अनिता व्यक्त झाली.

Anita Date: जी व्यक्ती अस्तित्वात नाही, जिवंत नाही ती.., अनिता दातेसमोर चौकटीतील भूमिकेचं आव्हान
Anita DateImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 8:22 AM

‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेतील राधिका सुभेदार या पात्राने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आणि हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आता नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेत रमा या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी रमाला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील अनिता प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करणार याची हमी प्रेक्षकांना मिळाली. फ्रेमच्या चौकटीमधली रमा मालिकेत काय रंजक वळण आणणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल पण ही भूमिका साकारणं किती आव्हानात्मक आहे याबद्दल अनिता व्यक्त झाली.

“मी साकारत असलेली रमा ही फोटोफ्रेममधून बोलणार आहे. जी व्यक्ती अस्तित्वात नाही, जिवंत नाही ती जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न मी करतेय. फ्रेममधून बोलणं काही अवघड नाही. ते सहज आहे. फक्त इथे देहबोलीतून प्रतिक्रिया देता येत नाही. एका चौकटीत काम करावं लागतंय. अशी भूमिका करणं म्हणजे आव्हानच आहे. कमीत कमी साधनामधून जास्तीत जास्त गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि मलाही उत्सुकता आहे की, मी हे कसं साकार करणार आहे .त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हान आहे”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

काही दिवसांपूर्वी अनिता दातेच्या फोटो फ्रेमला हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटोसोबत ‘जो आवडतो सर्वांना..’ असं कॅप्शनदेखील देण्यात आलं होतं. या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय? हा फोटो शेअर करण्यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे. नुकताच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला आहे. नवा गडी नवं राज्य असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

या मालिकेत अनिता दाते हिचं पात्र या जगात नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एण्ट्री घेत आहे. या मालिकेत अनिता दाते रमाची भूमिका सादर करणार असून, आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे. पल्लवी पाटील या मालिकेतून टीव्ही माध्यमात पदार्पण करतेय. तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....