जबरा फॅन थेट माधुरी दीक्षितच्या घरात शिरला, आणि म्हणाला…

द कपिल शर्मा हा रिअॅलिटी शो अनेकांच्या गुपित गोष्टी उघड करतो. असंच धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं एक क्रेझी गुपित या कार्यक्रमात उघड झालं.

जबरा फॅन थेट माधुरी दीक्षितच्या घरात शिरला, आणि म्हणाला...
माधुरी दीक्षित
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 12:31 PM

आयेशा सय्यद, मुंबई: द कपिल शर्मा हा रिअॅलिटी शो अनेकांच्या गुपित गोष्टी उघड करतो. असंच धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं ( Dadhuri Dixit) एक क्रेझी गुपित या कार्यक्रमात उघड झालं. माधुरीची ‘द फेम गेम’ (The Fame Game) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी माधुरी द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma) गेली होती. यावेळी कपिलच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने आपल्या एका फॅनबाबतचा एक मजेदार किस्सा तिने सांगितला. माधुरीने सांगितलं की, “काही दिवसांपूर्वी माधुरीच्या घरातील इलेक्ट्रिक स्वीचबोर्ड खराब झाला होता. तो दुरुस्त करण्यासाठी मी इलेक्ट्रिशिअनला बोलावलं त्यावेळी चार जण आले होते. थोड्यावेळात स्वीचबोर्ड दुरुस्त झाला. तीन जण निघून गेले मात्र एक जण तिथेच होता. त्याला मी विचारलं की तू त्यांच्यासोबत गेला नाहीस? तर तो म्हणाला, “मॅडम, मी इलेक्ट्रिशिअन नाहीये… मी त्यांच्यासोबत आलो पण फक्त तुम्हाला बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी…”, असा हा मजेदार किस्सा सांगिल्यानंतर कपिलच्या शोमध्ये हास्याचे फवारे उडाले. माधुरीने सांगितलेला हा किस्सा अनेकांच्या भुवया उंचावणारा होता. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

माधुरीचा क्रेझी फॅन

माधुरी दीक्षितचे करोडो फॅन्स आहेत. तिच्या अदांवर फिदा असणारा तिचा चाहता वर्ग तिला भेटण्यासाठी आतुर असतो. असाच एक क्रेझी फॅन माधुरीच्या भेटीला आला. कसा? याबद्दलचा किस्सा माधुरीने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला. “काही दिवसांपूर्वी माधुरीच्या घरातील इलेक्ट्रिक स्वीचबोर्ड खराब झाला होता. तो दुरुस्त करण्यासाठी मी इलेक्ट्रिशिअनला बोलावलं त्यावेळी चार जण आले होते. थोड्यावेळात स्वीचबोर्ड दुरुस्त झाला. तीन जण निघून गेले मात्र एक जण तिथेच होता. त्याला मी विचारलं की तू त्यांच्यासोबत गेला नाहीस? तर तो म्हणाला, “मॅडम, मी इलेक्ट्रिशिअन नाहीये… मी त्यांच्यासोबत आलो पण फक्त तुम्हाला बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी…”, असा हा मजेदार किस्सा माधुरीने सांगिल्यानंतर कपिलच्या शोमध्ये हास्याचे फवारे उडाले.

 कपिलचे श्रीराम नेनेंवर विनोद, माधुरीची रिअॅक्शन

कपिल शर्माने या कार्यक्रमात माधुरीचे पती श्रीराम नेने यांच्यावर एक विनोद केला. त्यावर माधुरीने अशी रिअॅक्शन दिली की उपस्थितांचं तिने मन जिंकलं. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. कपिलने माधुरीकडे पाहत ‘आम आदमी के बस की बात नहीं है अपने दिल की धड़कन संभालना यही वजह है कि माधुरी मॅडमने दिल के डॉक्टर से शादी करी है.’ असं म्हटल्यानंतर माधुरी मोठ्याने हसू लागली आणि अशी रिअॅक्शन दिली उपस्थित असलेली लोक खूश झाली. सध्या हा माधुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहते त्या व्हिडीओवरती अधिक कमेंट करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर माधुरीचं आणि श्रीराम नेने यांचं पहिलं बोलणं कसं झालं असेल त्यावर कपिल शर्मा याने पुन्हा विनोद केला त्यावर माधुरी लाजली असल्याचे देखील व्हिडीओत दिसत आहे.

द कपिल शर्माच्या शोमध्ये आत्तापर्यंत अनेकांवरती विनोद केल्याचे आपण पाहतो. तिथं अनेक सेलिब्रिटी आत्तापर्यंत प्रमोशनच्या निमित्ताने गेले आहेत. तिथं गेल्यानंतर कपिल शर्माकडून त्यांना त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारतो. काहीवेळेस त्यांच्या खासगी आयुष्याला घेऊन अधिक चर्चा असते. नुकतीच माधुरी दिक्षीत, संजय कपूर हे दोघे कपिल शर्माच्या शो मध्ये गेले होते.तेव्हा तिथे माधुरीने तिच्या फॅनबद्दलचा किस्सा सांगितला.

संबंधित बातम्या

“दिल की ऐ धड़कन ठेहरजा मिल गयी…”, रोहित आणि जुईली हनीमूनसाठी गोव्यात

The Kapil Sharma Show: कपिल शर्माने श्रीराम नेनेंवर केला विनोद, माधुरीची अशी रिअॅक्शन; व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?

सलमान खानच्या बहिणीने खरेदी केलं 10 कोटींचं घर, तुम्हाला माहिती आहे का ? ते अलिशान घर कुठे आहे ?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.