Abdu Rozik | बिग बाॅसच्या घराला मिस करतोय अब्दु रोजिक, अजूनही करत आहे हे काम, व्हिडीओ व्हायरल

अब्दु रोजिक हा मुळ तजाकिस्तानी गायक आहे. लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये अब्दु रोजिकचा धमाका बघायला मिळणार आहे.

Abdu Rozik | बिग बाॅसच्या घराला मिस करतोय अब्दु रोजिक, अजूनही करत आहे हे काम, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 8:54 PM

मुंबई : बिग बाॅस १६ च्या घरात छोटा अब्दु रोजिक धमाल करताना दिसला होता. अब्दु हा बिग बाॅसच्या घरातील सर्वात लाडका सदस्य होता. मात्र, काही कारणामुळे अब्दु रोजिक याला बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरातून बाहेर पडावे लागले. अब्दु बिग बाॅसच्या घरातून जेंव्हा बाहेर पडला तेंव्हा घरातील सर्वच सदस्य रडताना दिसले. अब्दु रोजिक हा एक इंटरनॅशनल स्टार आहे. त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. बिग बाॅसच्या घरात अब्दु रोजिक असताना साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टॅन यांची खास जोडी बघायला मिळाली. विशेष म्हणजे या जोडीला प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रेम दिले. अब्दु रोजिक (Abdu Rozik) याला हिंदी सजमत नसल्याने अनेकदा बिग बाॅसला अब्दुला काही गोष्टी या इंग्रजीमध्ये सांगाव्या लागत होत्या. अब्दु रोजिक हा फक्त १८ वर्षांचा असून तो कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. अब्दु रोजिक हा मुळ तजाकिस्तानी गायक आहे. लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये अब्दु रोजिकचा धमाका बघायला मिळणार आहे.

अब्दु रोजिक हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नुकताच अब्दु याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अब्दु हा प्यार हे गाणे म्हणताना दिसत असून यावेळी अब्दु रोजिक हा स्वत:चे कपडे धुताना दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना अब्दु रोजिक याने #BiggBoss16 असे लिहिले असून बिग बाॅसच्या घरातील कामाची सवय अजूनही गेली नसल्याचे अब्दु रोजिक याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. बिग बाॅसच्या घरात असताना अब्दु रोजिक हा स्वत:चे कपडे धुवायचा.

म्हणजेच काय तर आता बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतरही अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घराला मिस करत आहे. अब्दु रोजिक याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत अब्दुला मिस करत असल्याचे म्हटले आहे.

बिग बाॅसच्या घराबाहेर आल्यानंतर अनेक मुलाखती या अब्दु रोजिक याने दिल्या आहेत. यावेळी त्याने शिव ठाकरे किंवा एमसी स्टॅन यांना बिग बाॅस १६ चा विजेता म्हटले. इतकेच नाहीतर प्रियंका चाैधरी खूप चालाख असल्याचे देखील त्याने म्हटले होते.

एका मुलाखतीमध्ये अब्दु रोजिक याने घरातील फेक सदस्य म्हणून टीना दत्ता आणि शालिन भनोट यांचे नाव घेतले. शालिन भनोट आणि टीना दत्ता फक्त बिग बाॅसच्या घरात अभिनय करतात, असे अब्दु रोजिक हा म्हणाला होता.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.