KBC 16: भावासोबत कसे आहे नाते, अमिताभ बच्चनने प्रथमच सांगितले…तो धमकी देत होता…
amitabh bachchan brother: केबीसीमधील या संवादाचा व्हिडिओ सोनी टीव्हीने X (ट्विटर) वर शेयर केले आहे. त्याला अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले आहे. त्याला कॅप्शन दिले आहे “हर भाई बहन होते तो एक जैसे ही है”. केबीसी 15 फॅमिली स्पेशल वीक दरम्यान बिग बी यांनी आपले भाऊ अजिताभ बच्चन यांचा किस्सा शेअर केला.
KBC 16: बॉलीवूड महानायक बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा चर्चेत आले आहे. सध्या त्यांचा ‘कौन बनेगा करोड़पति’चा सिझन 16 सुरु आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9 वाजता प्रसारीत केला जात आहे. या शोधमधून बिग बी अमिताभ बच्चन कंटेस्टेंटकडून त्याचे खासगी जीवनाचे किस्से काढून घेतात. तसेच स्पर्धेकही अमिताभला विविध प्रश्न विचारुन त्यांचा भूतकाळ समोर आणतात. कॉलेज जीवनापासून चित्रपटापर्यंत अनेक प्रश्न स्पर्धकही अमिताभ बच्चन यांना विचारतात आणि अमिताभ त्यांना उत्तरे देतात. केबीसीमधील एका स्पर्धकाने अमिताभ यांना त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांच्यासंदर्भातील नात्यावर प्रश्न विचारला. अमिताभ यांनी त्याला उत्तर दिले.
दोघांचे नाते कसे होते?
केबीसीमधील एका स्पर्धेकाने अमिताभ यांचा विचारले, तुमचेही लहान भाऊ आहेत, तुम्हा दोघांमधील नाते कसे आहे? त्यावर अमिताभ यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. ते म्हणाले, जसे इतर भाऊ-बहिणीचे नाते असते, तसेच नाते आमचेही होते. आम्ही खूप गोष्टी एकमेकांना शेअर करत होतो. अगदी ज्या गोष्टी आई-बाबांना सांगता येणार नाही, त्या गोष्टी भावाकडे (सीक्रेट) शेअर करत होतो. माझे माझ्या भावासोबत नाते नेहमी प्रेमाचे राहिले आहे. मग या प्रेमात भांडण आलेच. जेव्हा केव्हा आमचे भांडण होते होते, तेव्हा तो धमकी देत होतो, ते सीक्रेट आई-बाबांना सांगेल. या पद्धतीने आम्ही एकमेकांना ब्लॅकमेलसुद्धा करत होतो.
सोनीकडून व्हिडिओ सोशल मीडियावर
केबीसीमधील या संवादाचा व्हिडिओ सोनी टीव्हीने X (ट्विटर) वर शेयर केले आहे. त्याला अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले आहे. त्याला कॅप्शन दिले आहे “हर भाई बहन होते तो एक जैसे ही है”. केबीसी 15 फॅमिली स्पेशल वीक दरम्यान बिग बी यांनी आपले भाऊ अजिताभ बच्चन यांचा किस्सा शेअर केला.
Sab bhai-behen hote toh ek jaise hi hai 🤣
Dekhiye #KaunBanegaCrorepati, Mon-Fri raat 9 baje sirf #SonyEntertainmentTelevision par.@SrBachchan#KBConSonyTV #KBC16 #KBC2024 pic.twitter.com/Osc4YlUB7e
— sonytv (@SonyTV) September 10, 2024
अमिताभ म्हणाले, माझी एक्टिंग करियरसाठी मला लहान भावाकडून खूप महत्वाचा सल्ला मिळाला. जसे भाऊ-बहिणीचे नाते असते, अथवा दोन भावाचे नाते असते, त्यात जो लहान असतो, त्याच्यासाठी सुरक्षात्मक वातावरण मोठा भाऊ करतो. आम्ही कोलकातामध्ये नोकरी करत होतो. तेव्हा अजिताभ याने माझा फोटो घेतला आणि एका स्पर्धेसाठी पाठवून दिला. तेव्हा तो म्हणाला, पाहा तुला चित्रपटात गेले पाहिजे.