VIDEO | लसीकरण केंद्राबाहेरच कार्तिकी गायकवाड गाऊ लागली ‘घागर घेऊन निघाली…’

पुण्यात राहणाऱ्या कार्तिकी गायकवाडने तिच्या मूळ गावी जालना जिल्ह्यात येऊन कोव्हिडची लस घेतली. (Kartiki Gaikwad Corona Vaccine)

VIDEO | लसीकरण केंद्राबाहेरच कार्तिकी गायकवाड गाऊ लागली 'घागर घेऊन निघाली...'
Kartiki Gaikwad Corona Vaccine


जालना : ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती ठरलेली सुप्रसिद्ध पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) हिने काल जालना येथे कोरोनावरील लस घेतली. कार्तिकीने सासर आणि माहेरच्या मंडळींसोबत लसीकरण करुन घेतले. लसीकरण केंद्राबाहेरच कार्तिकीने तिच्या प्रसिद्ध ‘घागर घेऊन निघाली…’ या गवळणीवर ताल धरला. (SaReGaMaPa Little Champ winner Kartiki Gaikwad takes Corona Vaccine at Jalna)

कार्तिकीचे सहकुटुंब लसीकरण

पुण्यात राहणाऱ्या कार्तिकी गायकवाडने तिच्या मूळ गावी जालना जिल्ह्यात येऊन कोव्हिडची लस घेतली. यावेळी तिच्यासोबत तिचा पती रोनित पिसे, आई, वडील आणि प्रसिद्ध गायक कल्याणजी गायकवाड आणि भाऊ कौस्तुभ गायकवाड यांनीही यावेळी लस घेतली. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी अर्जुन खोतकर मित्रमंडळाच्या नावाने जालन्यात लसीकरण केंद्र आयोजित केले आहे. याच ठिकाणी कार्तिकी गायकवाडने आपल्या पूर्ण कुटुंबासोबत कोव्हिडची लस घेतली.

‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यासारख्या कार्तिकीच्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावले आहे. लसीकरणानंतर पत्रकारांनी कार्तिकीला तिच्या प्रसिद्ध गवळणीच्या दोन ओळी गाण्याचा आग्रह केला. त्यांना मान देत कार्तिकीने ‘घागर घेऊन… घागर घेऊन… घागर घेऊन… निघाली पाण्या गवळण’ हे गाणे गायले.

पाहा व्हिडीओ :

आळंदीत संगीताचा वारसा

गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरु कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते. जवळपास 12 वर्षांपूर्वी सारेगमपच्या ‘लिटिल चॅम्प’ पर्वातून कार्तिकीचा प्रवास सुरु झाला. दरम्यानच्या काळात तिने अनेक मैफिली आपल्या दमदार आवाजाने गाजवल्या आहेत. भक्तीसंगीत ते लावणी अशा हरतऱ्हेची गाणी कार्तिकीच्या गळ्यात शोभतात. (Kartiki Gaikwad Corona Vaccine)

पाच महिन्यांपूर्वी विवाहबंधनात

कार्तिकी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकली. 26 जुलैला साखरपुडा करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. कार्तिकीचा पती रोनित पिसे पुण्याचा राहणारा असून इंजिनिअर आहे. त्यालाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे.

संबंधित बातम्या :

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाड अडकली ‘लग्नबंधनात’, पाहा या सोहळ्याची खास क्षणचित्रे…

(SaReGaMaPa Little Champ winner Kartiki Gaikwad takes Corona Vaccine at Jalna)