‘शेरनी कमबॅक!’, सिद्धार्थसोबतच्या गाण्यानंतर शहनाज गिलने सोशल मीडियावर शेअर केला नवा व्हिडीओ

करोडो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री शहनाज गिलचे (Shehnaaz Gill) आयुष्य हळूहळू आता सामान्य स्थितीत येत आहे. काही काळापूर्वी शहनाजने 'तू येही है' हा म्युझिक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून शहनाजने तिचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्ला याला श्रद्धांजली वाहिली होती.

‘शेरनी कमबॅक!’, सिद्धार्थसोबतच्या गाण्यानंतर शहनाज गिलने सोशल मीडियावर शेअर केला नवा व्हिडीओ
Shehnaaz Gill


मुंबई : करोडो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री शहनाज गिलचे (Shehnaaz Gill ) आयुष्य हळूहळू आता सामान्य स्थितीत येत आहे. काही काळापूर्वी शहनाजने ‘तू येही है’ हा म्युझिक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून शहनाजने तिचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्ला याला श्रद्धांजली वाहिली होती. आज (16 ऑक्टोबर) शहनाजने पुन्हा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शहनाज शूटिंगमध्ये व्यस्त असताना आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे सांगत आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज अनेक दिवस मीडियापासून दूर राहिली होती. परंतु, मित्र, कुटुंब आणि चाहत्यांच्या पाठिंब्याने शहनाजला पुन्हा उभं राहण्याची हिंमत दिली. कदाचित सर्वांच्या प्रेमाचाच हा परिणाम असेल की, ती पुन्हा एकदा कामावर परतली आहे. नवीन व्हिडीओमध्ये शहनाज ‘बॅक टू बॅक’ शूट, मेकअप आणि झोपेची कमतरता यामुळे तिचे आयुष्य कसे विस्कळीत झाले आहे, हे सांगत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

अशा परिस्थितीत ती त्वचेच्या काळजीसाठी बायोटिक उत्पादने वापरते. व्हिडीओमध्ये शहनाज तिचा मेकअप रुटीन चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. शहनाजच्या पुनरागमनामुळे तिचे चाहते आणि प्रेक्षक खूप खूश झाले आहेत. व्हिडीओवर चाहते शहनाजला स्ट्राँग राहण्याचा सल्लाही देत ​​आहेत. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाजचा हा पहिला व्यावसायिक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये तिने आपल्या कामाचा उल्लेख केला आहे.

हे अवघड आहे, पण अशक्य नाही!

शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री संपूर्ण जगाला माहीत आहे. एक काळ असा होता जेव्हा शहनाज सिद्धार्थशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हती आणि आता तिला तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या मित्राशिवाय घालवावे लागत आहे. हे सर्व शहनाजसाठी खूप अवघड आहे, पण अशक्य नाही.  तिच्या या प्रवासात चाहते देखील खंबीरपाने पाठीशी उभे राहिले आहेत.

शहनाज कामावर परतली

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिलची प्रकृती खूपच खराब झाली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आता सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडीओ आता शहनाज कामावर परतल्याचे कळत आहे. तिचा पंजाबी चित्रपट ‘हौंसला रख’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शहनाजसोबत दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातील शहनाजचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

शहनाज आणि सिद्धार्थ यांची भेट कशी झाली?

सिद्धार्थ आणि शहनाज ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून आले होते. शो दरम्यानच शहनाज सिद्धार्थच्या प्रेमात पडली. ती सिद्धार्थला हे अनेक वेळा सांगत असे. पण सिद्धार्थ यील नेहमी स्वतःची चांगली मैत्रीण मानत असे. दोघांचीही केमिस्ट्री चाहत्यांना शोमध्ये खूप आवडली आणि त्यांनी या जोडीला ‘सिडनाज’ असे नाव दिले होते.

शोमधून बाहेर पडल्यानंतरही शहनाज अनेक मुलाखतींमध्ये म्हणायची की, तिला सिद्धार्थ आवडतो. पण नेहमीप्रमाणे सिद्धार्थने तिला मैत्रीण म्हटले. मात्र, अभिनेता नेहमीच असे म्हणत असे की, शहनाज त्याच्या खूप जवळ आहे. सिद्धार्थ आणि शहनाज पुन्हा एकदा म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले आणि दोघांच्या गाण्यांना प्रेक्षकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा :

‘मेहंदी हे रचनेवाली…’, ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याच्या लग्नसोहळ्याची सुरुवात! पाहा फोटो..

राजकुमार राव आणि पत्रलेखा अडकले विवाहबंधनात, अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI