TMKOC | दिलीप जोशींना ‘जेठालाल’ नाही तर ‘ही’ भूमिका झाली होती ऑफर, पुढे असं घडलं की….

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) ही गेली 13 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

TMKOC | दिलीप जोशींना ‘जेठालाल’ नाही तर ‘ही’ भूमिका झाली होती ऑफर, पुढे असं घडलं की....
दिलीप जोशी
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 11:20 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) ही गेली 13 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. मग, ती दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकाणी (Disha Vakani) असो वा, जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी (Dilip Joshi). प्रत्येकाने आपल्या खास शैलीने चाहत्यांना वेड लावले आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, अभिनेते दिलीप जोशी यांना आधी ‘जेठलाल’ नव्हे, तर दुसर्‍या एका पात्राची ऑफर देण्यात आली होती (Taarak Mehta ka ooltah chashmah jethalal fame actor Dilip joshi got an offer for bapuji role first).

एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते दिलीप जोशी यांनी सांगितले होते की, त्यांना ‘चंपकलाल गडा’ अर्थात ‘बापूजी’ म्हणजेच जेठालालचे वडील साकारण्याची ऑफर देण्यात आली होती. सध्या अभिनेते अमित भट्ट ही भूमिका साकारत आहेत. एका वयस्क व्यक्तिरेखेला आपण योग्य न्याय मिळवू शकणार नाही, असं त्यांना वाटल्यामुळे दिलीप जोशींनी ‘चंपकलाल गडा’ची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ‘बापुजी’ साकारणारे अभिनेते अमित भट्ट हे वयाने दिलीप जोशी यांच्यापेक्षा लहान आहेत.

‘जेठालाल’ बनली ओळख!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिलीप जोशी आता टीव्ही इंडस्ट्रीतील असे एक अभिनेते आहेत, ज्यांना सर्वाधिक मानधन दिले जाते. दिलीप जोशी आपल्या हे आपल्या पात्राला पूर्ण न्याय देतात. ‘जेठालाल’च्या व्यक्तिरेखेत ते लोकांना इतके आवडले आहेत की, प्रत्येकजण त्यांना आता ‘जेठालाल’ या नावानेच ओळखतात(Taarak Mehta ka ooltah chashmah jethalal fame actor Dilip joshi got an offer for bapuji role first).

यशस्वी 13 वर्षे!

(Taarak Mehta ka ooltah chashmah jethalal fame actor Dilip joshi got an offer for bapuji role first)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो 13 वर्षांपूर्वी दिलीप जोशी, दिशा वाकाणी, मुनमुन दत्ता, शैलेश लोढा यांच्यासह अनेक कलाकारांसमवेत सुरू झाला होता. सध्या अनेक कलाकारांनी हा कार्यक्रम सोडला असून, त्यांच्या जागू नवीन कलाकार काम करत आहेत. परंतु, अद्याप दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकाणी या शोमध्ये परतली नाहीत आणि अजूनपर्यंत तिची रिप्लेसमेंटही आणली गेली नाहीय.

‘दयाबेन’ची वापसी कधी?

या मालिकेत ‘हे मा, माताजी…’ म्हणणारी ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी 2017मध्ये प्रसूतीच्या रजेवर गेली होती. पण, त्यानंतर ती पुन्हा एकदा शोमध्ये परतलेली नाही, निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी अनेक वेळा दिशाला परत येण्यास सांगितले, पण दोघांनाही अद्याप यावर सहमती मिळाली नाही. यामुळे ती परत येऊ शकली नाहीय. रिपोर्ट्सनुसार, लवकरच नवीन दयाबेन शोमध्ये दिसणार होती. पण आत्तापर्यंत तसे झालेले नाही.

मध्यंतरी दिशा वाकाणीच्या परत आल्याच्या बातम्या येत होत्या. पण, रिपोर्टनुसार दयाबेन अद्याप ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये परतलेल्या नाहीत. नुकतीच अभिनेत्री राखी व्हिजनने या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिची इच्छा पूर्ण होईल की नाही, ते केवळ निर्मात्यांवर अवलंबून आहे.

(Taarak Mehta ka ooltah chashmah jethalal fame actor Dilip joshi got an offer for bapuji role first)

हेही वाचा :

Ram Setu | ‘राम लला’समोर ‘राम सेतु’चा मुहूर्त संपन्न, अक्षय कुमारने शेअर केला खास फोटो!

First Photo | अमृता राव-आरजे अनमोलने शेअर केला बाळाचा फोटो, पाहा ‘वीर’ची पहिली झलक!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.