अभिनेत्री चित्राच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक, सिरीअलमधील भूमिकेवरुन वादाची चर्चा

पोलिस गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री चित्रा कामराजचा पती हेमंतची चौकशी करत होते.

अभिनेत्री चित्राच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक, सिरीअलमधील भूमिकेवरुन वादाची चर्चा
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 9:50 AM

चेन्नई : तमिळ अभिनेत्री चित्रा कामराजच्या (VJ Chithra) आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. चित्राला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली हेमंतला अटक करण्यात आली आहे. चित्रा गेल्या आठवड्यात चेन्नईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर हेमंत चित्राला मारहाण करत असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. (Tamil Actress Chithra husband Hemant arrested for alleged abetment of suicide)

चित्रा मालिकेत साकारत असलेल्या भूमिकेमुळे हेमंत नाखुश होता. ज्या दिवशी चित्राचा मृत्यू झाला, त्याआधी हेमंतने तिला जोराने धक्काही मारला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी हेमंतवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस गेल्या काही दिवसांपासून हेमंतची चौकशी करत होते. चित्राचे मित्र-मैत्रिणी आणि मालिकेतील सहकलाकारांचीही पोलिसांनी चौकशी केली होती. चेन्नईतील ईवीपी फिल्मसिटीमध्ये शूटिंग झाल्यानंतर 10 डिसेंबरला रात्री 2:30 वाजता ती हॉटेलला परतली.

हेमंतचा जबाब काय?

चित्रा आणि हेमंत एकत्रच हॉटेलमध्ये राहत होते. “रुममध्ये परत आल्यावर चित्रा आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. मात्र बराच वेळ परत न आल्यामुळे आपण दरवाजा ठोठावला. आतून काहीच आवाज आला नाही. त्यामुळे मी हॉटेल स्टाफकडून डुप्लिकेट चावीने दार उघडले. तेव्हा ती सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळली” असा जबाब हेमंतने दिला.

विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स (Pandian Stores) या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातच चित्राने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय, सहकलाकार आणि फॅन्सही धक्क्यात आहेत.

आत्महत्येच्या काही तास आधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि स्टोरीही शेअर केले होते. त्यानंतर तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Tamil Actress Chithra husband Hemant arrested for alleged abetment of suicide)

अँकर म्हणून यशस्वी कारकीर्द

चित्राने 2013 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी अँकर म्हणून कारकीर्द सुरु केली. व्हीजे चित्रा म्हणून तिने मनोरंजन विश्वात नाव कमावलं. सुरुवातीला तिने अनेक तामिळ टीव्ही कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं होतं.

मन्नन मंगल मालिकेतून चित्राने मालिका विश्वात पाऊल ठेवलं, तिने केलेल्या मोजक्या मालिकांपैकी वेलुनाची मालिकेतील तिची मुख्य भूमिका गाजली होती. याशिवाय चिन्ना पापा पेरिया पापा, डार्लिंग डार्लिंग अशा काही मालिकाही तिने केल्या.

चित्रा उत्तम नृत्यांगनाही होती. ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. जोडी अनलिमिटेड या शोमध्ये ती उपविजेतेपद पटकावलं होतं.

चित्राची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Chitra kamaraj (@chithuvj)

संबंधित बातम्या 

प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची आत्महत्या, वयाच्या 28 व्या वर्षी गळफास

अँकर, अभिनेत्री, नृत्यांगना… आठ वर्षांच्या करिअरमध्ये चित्राची भरारी

(Tamil Actress Chithra husband Hemant arrested for alleged abetment of suicide)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.