Bigg Boss 16 | ‘बिग बॉस 16’ मध्ये हे होणार मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर…

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार यंदाचे बिग बॉसचे सीजन अधिक खास ठरणार आहे. बिग बॉस 16 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये हे होणार मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर...
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 29, 2022 | 9:07 AM

मुंबई : बहुचर्चित बिग बॉस 16 (Bigg Boss 16) आता चाहत्यांच्या भेटीला लवकरच येत आहे. चाहत्यांमध्ये बिग बॉसबद्दल कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. बिग बॉस 16 चे अनेक प्रोमो (Promo) सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. आता बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे जवळपास समजली आहेत. इतकेच नाही तर करण कुंद्रापासून ते शहनाज गिलपर्यंत अनेकजण सीनियर्स बिग बॉस 16 मध्ये सहभागी देखील होणार आहेत. यंदा बिग बॉसमध्ये (Bigg Boss) काय धमाका होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार यंदाचे बिग बॉसचे सीजन अधिक खास ठरणार आहे. बिग बॉस 16 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना बेडरूममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टास्क करावा लागणार आहे. टास्क पूर्ण केल्यानंतरच बेडरूममध्ये प्रवेश मिळणार आहे.

यंदाची बिग बॉसची थीम देखील खास आहे. नेमकी काय थीम आहे, याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, यावेळी बिग बॉस 16 च्या घरात चार बेडरूम बनवण्यात आल्या आहेत. या चारही बेडरूमला वेगवेगळे नाव देण्यात आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 16 मध्ये शालिन भानोत, सुंबुल तौकीर अर्थात आपल्या सर्वांची लाडकी इमली, शिव ठाकरे, मान्या सिंह, सौंदर्या शर्मा, गौतम विग, टीना दत्ता हे स्पर्धेक सहभागी होणार आहेत. अजूनही सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांची नावे कळू शकली नाहीयेत. सलमान खान बिग बॉस 16 ला होस्ट करताना दिसणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें