Video | एका धाग्यावर टिकलाय उर्फी जावेदचा ड्रेस, हटके फॅशन सेन्समुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल!

'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडतो. परंतु, त्यामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोल देखील केले जाते.

Video | एका धाग्यावर टिकलाय उर्फी जावेदचा ड्रेस, हटके फॅशन सेन्समुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल!
Urfi Javed

मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडतो. परंतु, त्यामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोल देखील केले जाते. उर्फीने पुन्हा एकदा तिची अशाच बोल्ड ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत, ज्यामुळे तिची पुन्हा एकदा खिल्ली उडवली जात आहे.

या फोटोंमध्ये आणि व्हिडीओमध्ये, उर्फीचा ड्रेस फक्त एका धाग्यावर टिकलेला दिसतो. ती फोटो क्लिक करण्यासाठी पोज देताना दिसत आहे. तिची ही स्टाईल खूप पसंत केली जात आहे. पण काही लोकांना तिचा ड्रेस अजिबात आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

एका यूजरने लिहिले की, ‘पहिल्या अवतारात ती परत आली आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली, ‘तू किती घाणेरडी दिसतेयस.’ कुणीतरी लिहिलंय, ‘किती विश्वास तोही केवळ एका धाग्यावर…’ अशा प्रकारे युजर्स उर्फीला निशाणा बनवत आहेत. मात्र, उर्फी जावेदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ट्रोलिंगला भीक घालत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी जावेदने स्वतःचा एक व्हिडीओ करताना ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले होते. व्हिडीओमध्ये उर्फी जावेद लाल रंगाच्या टॉपसह डेनिम जीन्स परिधान करून फोटो पोज देताना दिसत आहे. तिने वर जॅकेट परिधान केले आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणते की, ‘जे माझ्या कपड्यांवरून मला ट्रोल करतात त्यांच्यासाठी हे माझे उत्तर आहे.’ यानंतर उर्फी (Urfi Javed) मागे वळते आणि तिच्या जॅकेटवर लिहिलेले असते की, ‘माइंड युवर ओन बिझनेस.’ उर्फी जावेदची ट्रोलला उत्तर देण्याची ही पद्धत तिच्या चाहत्यांना खूप आवडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

ब्रेकअपचे कारण देताना म्हणाली…

उर्फी जावेद पारस कालनावटसोबतच्या नात्याबद्दलही खूप चर्चेत होती. त्यांचे हे नाते फक्त 9 महिने टिकले. उर्फी जावेदने एका मुलाखतीदरम्यान पारससोबतच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते. ती म्हणाला, ‘पारस खूपच पझेसिव्ह होता. माझ्या नावाचे टॅटू काढून सतत मला प्रभावित करण्याचा तो वारंवार प्रयत्न करायचा. पारससोबत रिलेशनशिपमध्ये असणं ही माझी चूक होती. मला हे नाते सुरू झाल्यानंतर एक महिन्याने संपवायचे होते.

हेही वाचा :

Money Heist Season 5 Part 2 | Alicia गेम चेंजर ठरणार की प्रोफेसर पुन्हा एकदा मात देणार? ‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या भागात काय घडणार?

Happy Birthday Konkona Sen Sharma | लग्नाआधीच आई होण्याची चाहूल, तब्बल 10 वर्षांनंतर कोंकणा सेन शर्माने मोडला संसार!


Published On - 11:55 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI