Shalva Kinjawdekar | स्वीटूच्या ‘ओम’नं शेअर केला शर्टलेस फोटो, पाहून तरुणी म्हणाल्या ‘उन्हाळा सुरु झाला’!

मालिकेत ओम साकारणारा हॅण्डसम हंक, चॉकलेट बॉय, तरुणींचा लाडका अभिनेता शाल्व किंजवडेकर हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:13 PM, 9 Mar 2021
Shalva Kinjawdekar | स्वीटूच्या ‘ओम’नं शेअर केला शर्टलेस फोटो, पाहून तरुणी म्हणाल्या ‘उन्हाळा सुरु झाला’!
शाल्व किंजवडेकर

मुंबई : छोट्या पडद्यावर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेच अनोख कथानक, नवे चेहरे या सगळ्यामुळेच प्रेक्षकांची या मालिकेला पसंती मिळत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अर्थात ‘ओम’ साकारणाऱ्या अभिनेता शाल्व किंजवडेकर हा नवा चेहरा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. शाल्वने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे ‘शर्टलेस’ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे (Yeu Kashi Tashi mi Nandayla fame actor Shalva Kinjawdekar share shirtless photo on social media).

प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये आता मैत्रीचं नातं बहरत असतानाच, प्रेमाचं नवं नातं देखील उमलू लागलं आहे. ‘स्वीटू’ साकारणाऱ्या अन्विता फलटणकर आणि ‘ओम’ साकारणाऱ्या शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे.

शाल्वची पोस्ट!

(Yeu Kashi Tashi mi Nandayla fame actor Shalva Kinjawdekar share shirtless photo on social media)

तरुणींच्या भरभरून कमेंट्स…

मालिकेत ओम साकारणारा हॅण्डसम हंक, चॉकलेट बॉय, तरुणींचा लाडका अभिनेता शाल्व किंजवडेकर हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. शाल्वने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर शर्टलेस फोटो शेअर करत वातवरणातील तापमानाचा पारा वाढवलाय. आत्तापर्यंत 39 हजारांहून अधिक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर, अनेक चाहते विशेषतः तरुणी आणि मित्रमंडळींनी शाल्वच्या या फोटोशूटवर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे (Yeu Kashi Tashi mi Nandayla fame actor Shalva Kinjawdekar share shirtless photo on social media).

कोण आहे शाल्व किंजवडेकर?

पुण्यात जन्मलेल्या शाल्व किंजवडेकरचे शालेय शिक्षण पुण्यातील अक्षरनंदन स्कूल व त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. 2015मध्ये शाल्वला ‘Hunterrr’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. त्यानंतर त्याने करिअर म्हणून अभिनय क्षेत्राची निवड केली. हंटरनंतर, शाल्वने माधुरी दीक्षितसमवेत ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात काम केले होते. त्याने या चित्रपटात आदिची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर त्याला चित्रपट आणि वेब सीरीजच्या ऑफर येऊ लागल्या.

2019 मध्ये त्याने ‘वन्स इन अ इअर’ या एमएक्स प्लेयर वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून ‘ओमकार’ म्हणून तो घराघरांत पोहचला आहे.

मालिकेची कथा

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नव्हे, तर या नात्यात दोन कुटुंब जोडली जातात.आपलं माहेर, हक्काची माणसं सोडून मुलगी नव्या घरात जाते आणि तिथल्या माणसांना आपलसं करते. प्रत्येक गोष्ट शेअर करायला नवरा जरी सोबत असला तरीदेखील अनेकदा मुलींना त्यांच्या मैत्रिणींची उणीव भासत असते. परंतु, जर अशावेळी सासूचं मुलीची मैत्रीण झाली तर? खरं तर सासू-सुनेमधील मैत्रीचं हे नातं फार कमी वेळा पाहायला मिळतं. परंतु, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत असंच सासू-सुनेचं मैत्रीचं नातं पाहायला मिळणार आहे.

(Yeu Kashi Tashi mi Nandayla fame actor Shalva Kinjawdekar share shirtless photo on social media)

हेही वाचा :

Yeu Kashi Tashi mi Nandayla | मालिकांच्या विश्वात नेमकं चाललंय तरी का?, ‘येऊ कशी तशी..’च्या ‘त्या’ दृश्यावर प्रेक्षक संतापले!