ठाकरे सिनेमाची एचडी प्रिंट लीक, संजय राऊतांची पोलिसात धाव

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमालाही पायरसीचं ग्रहण लागलंय. रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा काही वेबसाईट्वर अपलोड करण्यात आलाय. सिनेमाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. सिनेमाला पहिल्या दिवशी तुफान प्रतिसाद मिळालाय. मात्र दुसऱ्या दिवशीच हिंदी भाषेतली प्रिंट लीक झाली. ठाकरे …

ठाकरे सिनेमाची एचडी प्रिंट लीक, संजय राऊतांची पोलिसात धाव

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमालाही पायरसीचं ग्रहण लागलंय. रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा काही वेबसाईट्वर अपलोड करण्यात आलाय. सिनेमाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. सिनेमाला पहिल्या दिवशी तुफान प्रतिसाद मिळालाय. मात्र दुसऱ्या दिवशीच हिंदी भाषेतली प्रिंट लीक झाली.

ठाकरे सिनेमा रिलीज झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. हिंदी आणि मराठी भाषेत हा सिनेमा रिलीज झालाय. महाराष्ट्रात मराठी भाषेतल्या सिनेमाला तुफान प्रतिसाद आहे. तर हिंदी सिनेमाला देशभरात प्रतिसाद आहे. तमिळ रॉकर्सने याच प्रसिद्धीचा फायदा घेत सिनेमा लीक केलाय. ठाकरे सिनेमासोबत रिलीज झालेला कंगना रणावतचा मणिकर्णिका हा सिनेमाही पायरेट करण्यात आलाय.

यापूर्वी तमिळ रॉकर्सकडून उरी, सरकार, काला, ठग्स ऑफ हिंदुस्तान, 2.0, विश्वरुपम 2 यांसारखे बिग बजेट सिनेमेही लीक करण्यात आले आहेत. पायरसी हा निर्मात्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय बनलाय. कारवाई केल्यानंतरही ही पायरसी सुरुच असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे.

तमिळ रॉकर्सकडून हा सिनेमा लीक केल्याचं बोललं जातंय. तमिळ रॉकर्सकडून अगोदर तमिळ आणि आता हिंदी, इंग्लिश सिनेमेही लीक केले जात आहेत. तमिळ सिनेमा निर्माता परिषदेच्या अध्यक्षांचेही तमिळ रॉकर्सच्या वेबसाईटमध्ये शेअर्स असल्याचा आरोप करण्यात येतो. तमिळ रॉकर्सकडून डोमेन्स नेहमी बदलण्यात येतात, ज्यामुळे प्रत्येक सिनेमा त्यांच्याकडून लीक केला जातो.

कॉपीराईट कायदा 1957 हा संपूर्ण देशात लागू आहे. पण कायदे असूनही पायरसी रोखण्यात अपयश आलेलं आहे. या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास सहा महिने ते तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिवाय 50 हजार ते दोन लाख रुपयापर्यंत दंडाचीही तरतूद आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *