आया रे सबका बाप रे, कहते है उसको 'ठाकरे', सिनेमातलं पहिलं गाणं रिलीज

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा (Thackeray) येत्या 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं म्युझिक लाँच मुंबईतील ताज लँड्स हॉटेलात पार पडलं. हा सिनेमा बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमातलं म्युझिकही तेवढंच एनर्जेटिक आहे. आया रे सबका बाप रे, कहते है उसको ‘ठाकरे’ हे गाणं ऐकताच सिनेमा पाहण्याचा उत्साह …

आया रे सबका बाप रे, कहते है उसको 'ठाकरे', सिनेमातलं पहिलं गाणं रिलीज

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा (Thackeray) येत्या 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं म्युझिक लाँच मुंबईतील ताज लँड्स हॉटेलात पार पडलं. हा सिनेमा बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमातलं म्युझिकही तेवढंच एनर्जेटिक आहे.

आया रे सबका बाप रे, कहते है उसको ‘ठाकरे’ हे गाणं ऐकताच सिनेमा पाहण्याचा उत्साह आणखी वाढतो. आपला आवाज आणि विशिष्ट शैली यामुळे करोडो लोकांच्या मनावर राज्य करून त्याचे मानबिंदू ठरणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरील “ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांना समर्पित केलेली गाणी जगभर गरजण्यास सज्ज झालेली आहेत.

ठाकरे सिनेमातील ‘आला रे आला’ हे गाणं पद्मश्री सुनील जोगी लिखित आणि नकाश अजीझ यांच्या आवाजातील गाणं म्हणजे बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे जल्लोषपूर्ण आणि उत्साहवर्धक आहे. तर ‘साहेब तू…” हे गाणं मनोज यादव यांच्या लेखणीतून अवतरलेले आणि सुखविंदर सिंग यांच्या मधूर स्वरांनी सजलेले गाणे काळजाला भिडते.

मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी गोडजोळी  रोहन-रोहन यांनी ही गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. दोन्ही भाषेतील या गाण्यांमध्ये ठाकरी टच आहे. सिनेमाचा ट्रेलर जितक्या दणक्यात लाँच झाला, तितक्याच दणक्यात म्युझिकही लाँच झालंय. या गाण्यांच्या लाँचिंगमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सिनेमातील कलाकर नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव यांच्यासह इतर मंडळींनीही हाजेरी लावली होती.

हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक शैली होती. त्यांच्या भाषणातील शिव्या सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडू शकतात. ट्रेलर लाँचिंगनंतरही हा वाद समोर आला होता. आता दोन्ही भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या हिंदी सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवलाय. रविवारी मराठी सिनेमाला सेन्सॉर बोर्ड काय निर्णय देतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *