या पाच गोष्टींमुळे 'अॅव्हेंजर्स एंडगेम' हिट

मुंबई : देशात लोकसभा निडणुका सुरु आहेत. सर्वत्र निवडणुका आणि मतदान याबद्दल चर्चा सुरु आहे. मात्र या निवडणुकांच्या धामधुमीत एक वर्ग असा आहे की, तो सध्या ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सीरिजमधील हा शेवटचा चित्रपट असल्याचे म्हटलं जात आहे. भारतात मोठ्या प्रमाणात ‘अॅव्हेंजर्सचे चाहते आहेत. अॅव्हेंजर्स एंडगेमने चित्रपट प्रदर्शित होताच भारतात 100 …

या पाच गोष्टींमुळे 'अॅव्हेंजर्स एंडगेम' हिट

मुंबई : देशात लोकसभा निडणुका सुरु आहेत. सर्वत्र निवडणुका आणि मतदान याबद्दल चर्चा सुरु आहे. मात्र या निवडणुकांच्या धामधुमीत एक वर्ग असा आहे की, तो सध्या ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सीरिजमधील हा शेवटचा चित्रपट असल्याचे म्हटलं जात आहे. भारतात मोठ्या प्रमाणात ‘अॅव्हेंजर्सचे चाहते आहेत. अॅव्हेंजर्स एंडगेमने चित्रपट प्रदर्शित होताच भारतात 100 कोटी रुपयांची कमाई केली.

मार्व्हल स्टूडीओने हा चित्रपट बनवला आहे. संपूर्ण जगात ‘अॅव्हेंजर्सचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. या चित्रपटामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, अॅव्हेंजर्स एंडगेम चित्रपटात असं काय आहे की, सर्वजण इतके आकर्षित होत आहेत.

या पाच गोष्टींमुळे ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ पाहावा

  • तुम्हाला बाहुबली चित्रपट आवडला होता, त्यातील अॅनिमेशन अप्रतिम होते, पाहताना मजा येत होती. बाहुबली चित्रपटातील काही सीन मार्व्हलच्या चित्रपटातून कॉपी केलेले आहेत. बाहुबली चित्रपटात जशी बाहुबली भूमिका सर्वांना आकर्षित करत आहे, तसेच अॅव्हेंजर्समध्ये अनेक सुपरहिरो आहेत त्यांनी सर्वांना आकर्षित केले आहे. हल्क, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक व्हिडो, थोर, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, स्कारलेच व्हिच, व्हिजन, होकाई, ग्रूट, अँट मॅन, कॅप्टन मार्व्हल आणि इतर महत्त्वाच्या भूमिका आहेत.
  • मार्व्हल स्टुडीओने टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला आहे. मार्व्हलचे चित्रपटात रिअॅलिटी दिसत आहे. यामध्ये एडिटिंगचे कामही छान आहे. स्वस्त आणि कमी दरातील अॅनिमेशनचा वापर मार्व्हलच्या चित्रपटात केला जात नाही.
  • अॅव्हेंजर्सचा यापूर्वीच्या चित्रपटातील अर्ध्याहून अधिक सुपरहिरो थैनोसने गायब केलेले आहेत. हे कसे केले? यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. सध्या प्रदर्शित करण्यात आलेल्या एंडगेममध्ये सुपरहिरो पुन्हा आलेले आहेत.
  • मार्व्हलचे वडील स्टेनली आहेत, म्हणजे सर्व भूमिका आणि कथा स्टेनलीची देण आहे. गेल्यावर्षी स्टेनलीचा मृत्यू झाला. अॅव्हेंजर्सच्या प्रत्येक चित्रपटात स्टेनलीची गेस्ट एन्ट्री नेहमी होते. अॅव्हेंजर्स एंडगेममध्येही होईल, असं म्हटलं जात आहे. स्टेनलीला पडद्यावर पाहण्यासाठी अनेकांना उस्तुकता असते.
  • थैनोस अॅव्हेंजर्समधील सुपर व्हिलन आहे. खूप पावरफुल असा व्हिलन आहे, गेल्या चित्रपटात त्याने अॅव्हेंजर्सवर हल्ला केला होता. पण सर्व अॅव्हेंजर्सनी एकत्र येत त्यांनी थैनोसचा पराभव केला आहे. ते सर्व हे कसे करतात, हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *