Kapil Sharma | ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात राजकुमार रावची धमाल, ‘वजनदार’ भारतीला उचलून डान्स करणार!

‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात राजकुमार राव आणि नुसरत भरुचा सहभागी होणार आहेत. ‘कपिल शर्मा शो’च्या आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:30 PM, 5 Nov 2020

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात राजकुमार राव आणि नुसरत भरुचा सहभागी होणार आहेत. ‘कपिल शर्मा शो’च्या आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे. दोघेही त्यांच्या आगामी ‘छलांग’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. या प्रोमोत राजकुमार आणि नुसरत आपल्या फिटनेसचे रहस्य सांगताना दिसत आहेत.(The Kapil Sharma Show upcoming episode Rajkumar Rao and bhrati dance)

प्रोमोमध्ये कपिल शर्माने राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे स्वागत केले आहे. त्यानंतर कपिल नुसरतबरोबर फ्लर्ट करताना दिसत आहे. कपिल नुसरत भरुचाला म्हणतो की, ‘तुझा चेहरा किती छोटा आहे’. यावर नुसरत म्हणते की, ‘डायट करते त्यामुळे!’ कपिल परत नुसरतला म्हणतो की, ‘तुझ्या गळ्यातील हार अतिशय सुंदर आहे. पण तो गळ्यात फसलेला आहे का?’, यावर सगळे जण हसायला लागतात.

यामध्ये सर्वात मजेदार म्हणजे राजकुमार भारतीला उचलून डान्स करतो. भारती राजकुमार आणि नुसरत यांना सांगितले की, लहानपणीपासुन मला अभिनेत्री होण्याची खूप इच्छा होती. यावर कपिल शर्मा भारतीला विचारतो का झाली नाही मग तु अभिनेत्री?, त्यावर भारती एक गंमतीशीर उत्तर देते. सतीश कौशिक, झीशान अयूब यांच्यासह अनेक कलाकार राजकुमार आणि नुसरतसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. छलांग चित्रपटाचे दिग्दर्शन हंसत मेहता यांनी केले आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी आले होते. त्यांच्या आगामी ‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही कपिल शर्मा शोमध्ये आले होते. यावेळी अक्षय कुमारने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्याची गोल्डन जुबली पूर्ण केली होती. अक्षय कुमारची ‘कपिल शर्मा शो’मध्ये येण्याची ही पंचविसावी वेळ होती. अक्षय कुमार ज्या ज्यावेळी कपिल शर्मा शोमध्ये आला, त्या त्यावेळी त्याने खुप धमाल केली आहे. कपिलला अक्षय कुमारने साडी नेसण्याचे चॅलेंज दिले होते. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी लक्ष्मी चित्रपटाच्या शुटींग वेळी घडलेले अनेक रंजक किस्से सांगितले.

अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणी आली होती. ती म्हणते की, ‘मी बर्‍याच दिवसांनंतर कपिल शर्मा शोमध्ये आले आहे. आणि मला खूप छान वाटते आहे.’ कपिल शर्मा कियारा अडवाणी विचारतो की, लॉकडाऊनमध्ये तू काय केले, यावर कियारा अडवाणी सांगते लॉकडाऊन लागण्याच्या अगोदरच आमच्या चित्रपटाचे शुटींग सुरू होते. त्यावेळी अक्षय कुमार सरांचे मेकअप मामा खूप छान लाडू तयार करून आणायचे आणि ते मला खूप आवडायचे त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मी ते लाडू बनवायला शिकले.

संबंधित बातम्या :

‘द कपिल शर्मा’ शोच्या आगामी भागात रितेश आणि जेनेलिया; धम्माल मस्ती पाह्यला मिळणार

सिद्धूला हटवल्यानंतर कपिल शर्माची पहिली प्रतिक्रिया

(The Kapil Sharma Show upcoming episode Rajkumar Rao and bhrati dance)