‘द लायन किंग’च्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या उड्या, व्हूजचा रेकॉर्ड!

मुंबई : हॉलिवूडचा बहुचर्चित सिनेमा ‘द लायन किंग’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासात या सिनेमाने जवळपास 34 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. रेकॉर्डब्रेक व्ह्यू मिळाल्यानंतर द लायन किंग हा 24 तासात सर्वाधिक पाहिला जाणार ट्रेलर ठरला आहे. याबद्दल डिस्नेनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. डिस्नेने ‘द लायन किंग’ या …

The lion king, ‘द लायन किंग’च्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या उड्या, व्हूजचा रेकॉर्ड!

मुंबई : हॉलिवूडचा बहुचर्चित सिनेमा ‘द लायन किंग’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासात या सिनेमाने जवळपास 34 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. रेकॉर्डब्रेक व्ह्यू मिळाल्यानंतर द लायन किंग हा 24 तासात सर्वाधिक पाहिला जाणार ट्रेलर ठरला आहे. याबद्दल डिस्नेनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. डिस्नेने ‘द लायन किंग’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.

याआधी ‘एव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर’ या हॉलिवूड सिनेमाच्या ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यू मिळाले होते.‘एव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर’ या सिनेमाच्या ट्रेलरने 24 तासामध्ये 23.8 कोटी व्ह्यू मिळवले होते.

1994 साली आलेल्या ‘द लायन किंग’ या सिनेमाचा अॅनिमेशन रिमेक आहे. जॉन फेवर्यू आणि डोनाल्ड बियॉन्से या दिग्दर्शकांनी हा सिनेमा रिमेक केला आहे. हा सिनेमा 2019 मध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे, 1994 नंतर डिस्ने पहिल्यांदा ‘द लायन किंग’च्या माध्यमातून अॅनिमेशन सिनेमा करत आहे. त्यामुळे जगभरातील चाहत्यांची द लायन किंगबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *