इंस्टाग्रामवरील ‘या’ फोटोने कायली जेनरलाही मागे टाकलं

मुंबई : इंस्टाग्रामवर अनेक लोक आपले फोटो आणि इतरही बरचं काही शेअर करत असतात. त्यानंतर त्याला किती लाईक्स मिळतात, किती कमेंट येतात याची स्पर्धा सुरु होते. हे तर तुम्ही-आम्ही रोजच बघतो. पण इंस्टाग्रामवर सर्वात जास्त लाईक्स मिळालेला फोटो कुठला माहिती आहे? नाही ना? आता गुगल करत बसू नका. आम्ही सांगतो. आपल्याला वाटत असेल की, हा …

इंस्टाग्रामवरील ‘या’ फोटोने कायली जेनरलाही मागे टाकलं

मुंबई : इंस्टाग्रामवर अनेक लोक आपले फोटो आणि इतरही बरचं काही शेअर करत असतात. त्यानंतर त्याला किती लाईक्स मिळतात, किती कमेंट येतात याची स्पर्धा सुरु होते. हे तर तुम्ही-आम्ही रोजच बघतो. पण इंस्टाग्रामवर सर्वात जास्त लाईक्स मिळालेला फोटो कुठला माहिती आहे? नाही ना? आता गुगल करत बसू नका. आम्ही सांगतो.

आपल्याला वाटत असेल की, हा फोटो एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचा असेल. तर तुम्ही 100 टक्के चुकलात. आता प्रश्न हा येतो की, अभिनेता किंवा अभिनेत्रीचा नाही, तर तो कुणाचा फोटो असेल ज्याला सर्वात जास्त लाईक्स मिळाले आहेत. नक्कीच कुठल्यातरी नेत्याचा असावा, किंवा एखाद्या सुंदर ठिकाणाचा, पण तसं नाहीये.

तुम्ही आधी तो फोटो पाहा-

हा फोटो बघून नक्कीच तुमच्या भुवया उंचावल्या असतील. हो एका अंड्याच्या या फोटोला इंस्टाग्रामवर सर्वात जास्त लाईक्स मिळाले आहेत. 4 जानेवारीला इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोने अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या फोटोंनाही मागे टाकले. या फोटोला आतापर्यंत 2.45 कोटीहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. इतकचं नाही तर हा फोटो आता वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहे.

या अकाउंटवरुन हा एकच फोटो पोस्ट करण्यात आला. त्यासोबत, ‘चला इंस्टाग्रामवर सर्वात जास्त लाईक्स मिळवणाऱ्या फोटोचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवू, कायली जेनरचा रेकॉर्ड तोडू’, असे कॅप्शन देण्यात आले आहे. या प्रोफाईलला 2.5 कोटींहून जास्त लोक फॉलो करतात. या प्रोफाईलला रेकॉर्ड बनवण्यासाठीच तयार करण्यात आल्याचं दिसून येतं.

 

View this post on Instagram

 

stormi webster ??

A post shared by Kylie (@kyliejenner) on

याआधीपर्यंत अमेरीकन टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा कायली जेनरले फेब्रुवारी 2018 ला एक फोटो शेअर केला होता. या फोटोला 1.8 कोटी लाईक्स मिळाले होते. कायली जेनरचे इंस्टाग्रामवर 12.3 कोटीहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

Take that little egg

A post shared by Kylie (@kyliejenner) on

अंड्याच्या पोस्टला बघता जेनरने आणखी एक पोस्ट शेअर केली. यात ती रस्त्यावर अंड फोडताना दिसते आहे. तिच्या या पोस्टलाही जवळपास 1.2 कोटी लाईक्स मिळाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *