‘हाऊज द जोश’, उरीच्या फेमस डायलॉगच्या जन्माची कहाणी

मुंबई : अभिनेता विकी कौशलचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. लवकरच या सिनेमाचा 200 कोटीच्या क्लबमध्ये समावेश होईल. या सिनेमामधील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग आज प्रत्येकाच्या तोंडावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भारतीय क्रिकेट संघापर्यंत देशातील दिग्गज हा डायलॉग म्हणताना दिसत आहेत. मात्र, हा डायलॉग कुठून आला …

‘हाऊज द जोश’, उरीच्या फेमस डायलॉगच्या जन्माची कहाणी

मुंबई : अभिनेता विकी कौशलचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. लवकरच या सिनेमाचा 200 कोटीच्या क्लबमध्ये समावेश होईल. या सिनेमामधील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग आज प्रत्येकाच्या तोंडावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भारतीय क्रिकेट संघापर्यंत देशातील दिग्गज हा डायलॉग म्हणताना दिसत आहेत. मात्र, हा डायलॉग कुठून आला माहित आहे?

या सिनेमात हा डायलॉग का घेण्यात आला, याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धार यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. त्यांचे लहानपणीचे काही मित्र हे संरक्षण क्षेत्रातील होते. ज्यांच्यासोबत ते नेहमी आर्मी क्लबला जात असत. दिल्लीमधील एका ठिकाणी ते त्यांच्या या मित्रांसोबत ख्रिसमस आणि नववर्ष अर्थात न्यू इयर सेलिब्रेट करायला जायचे. तिथे एक निवृत्त ब्रिगेडियर येत असत. ते सर्व मुलांना रांगेत उभं करुन ‘हाऊज द जोश’ म्हणायचे आणि त्याच्या उत्तरात ‘हाय सर’ असे म्हणावे लागायचे. यामध्ये ज्या मुलाचा आवाज सर्वात मोठा असायचा त्याला ते चॉकलेट द्यायचे. आदित्य यांना चॉकलेटची खूप आवड असल्याने ते मोठ्या आवाजात ‘हाय सर’ म्हणायचे आणि मग त्यांना चॉकलेट मिळायचे. लहानपणीच्या याच आठवणीला त्यांनी या सिनेमात वापरले.

‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’

हा सिनेमा 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत.

भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा सिनेमा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *