लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचं गूढ ‘या’ सिनेमातून उलगडणार?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:49 PM, 22 Mar 2019
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचं गूढ ‘या’ सिनेमातून उलगडणार?

मुंबई : ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘ठाकरे’ आणि ‘पीएम नरेंद्र मोदी’ या राजकीय सिनेमांनंतर आता आणखी एक राजकीय सिनेमाची यात भर पडणार आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा ‘द ताश्कंद फाईल्स’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित आहे.


राजकीय वर्तुळात आजही शास्त्रींच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. याच प्रश्नांची उत्तरं म्हणून हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’ या सिनेमाचा ट्रेलर येत्या 25 मार्चला लाँच करण्यात येणार आहे. तर पुढील महिन्यात 12 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली.

तरण आदर्श यांनी ट्विट केले की, “मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘द ताश्कंद फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर 25 मार्च 2019 ला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत नसरुद्दीन शाह, श्वेता बसू, पंकज त्रिपाठी, वुनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी आणि अंकुर राठी हे कलाकार दिसणार आहेत. विवेक रंजन अग्नीहोत्री यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.”

या सिनेमाची कहाणी ही लाल बहादूर शास्त्री यांच्या डेथ मिस्ट्रीवर आधारित आहे. सिनेमा निर्मात्यांनी या सिनेमावर तीन वर्ष रिसर्च केला. त्यानंतर हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

10 जानेवारी 1966 ला ताश्कंद येथे पाकिस्तानसोबतच्या शांती करारानंतर आवघ्या 12 तासांत 11 जानेवारीला लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं होतं. त्यांच्या आकस्मिक मृत्यूबाबत भारतातीयांच्या मनात आजही शंका आहे. त्यामुळे या सिनेमात कशाप्रकारे त्यांच्या मृत्यूचा खुलासा करण्यात आला आहे हे बघणं रंजक ठरणार आहे.