आमिर खान, कतरिनापेक्षाही जास्त टॅक्स भरतो हा कॉमेडियन; एकेकाळी होता नैराश्यात

सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली आहे. या यादीत अभिनेता शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत एक कॉमेडियनसुद्धा आहे, ज्याने आमिर खान आणि कतरिना कैफसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकलंय.

आमिर खान, कतरिनापेक्षाही जास्त टॅक्स भरतो हा कॉमेडियन; एकेकाळी होता नैराश्यात
Kapil SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 2:53 PM

2024 या वर्षातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे. या यादीत अभिनेता शाहरुख खान अग्रस्थानी असून त्याने यंदा 92 कोटी रुपये टॅक्स भरलंय. तर दुसऱ्या स्थानी साऊथ सुपरस्टार थलपती विजय आहे. सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत एका प्रसिद्ध कॉमेडियनचाही समावेश आहे. या कॉमेडियनने आमिर खान आणि कतरिना कैफ यांनाही मागे टाकलंय. एकेकाळी हा कॉमेडियन नैराश्यात होता आणि त्याने आत्महत्येचाही विचार केला होता. मात्र त्यानंतर त्याने स्वत:मध्ये बरेच बदल केले आणि आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर परतला आहे. हा कॉमेडियन दुसरा तिसरा कोणी नसून कपिल शर्मा आहे. ‘फॉर्च्युन इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार कपिल शर्माने 2024 मध्ये 26 कोटी रुपये टॅक्स भरला आहे.

सर्वाधिक टॅक्स भरणारे सेलिब्रिटी

शाहरुख खान- 92 कोटी रुपये थलपती विजय- 80 कोटी रुपये सलमान खान- 75 कोटी रुपये अमिताभ बच्चन- 71 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

2013 मध्ये कपिल शर्माने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो सुरू केला होता. या शोला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या शोचं नाव ‘द कपिल शर्मा शो’ असं ठेवलं गेलं. या शोमुळे कपिल टेलिव्हिजनवरील सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत सेलिब्रिटी बनला. त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलंय. 2017 मध्ये कपिलचा सहकलाकार सुनील ग्रोवरसोबत मोठा वाद झाला होता. त्यानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला होता. त्याच वर्षी त्याचा ‘किस किस को प्यार करूँ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. एकानंतर एक आलेल्या या संकटांमुळे कपिल नैराश्यात गेला होता.

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला होता, “सेलिब्रिटी असल्याने कोट्यवधी लोक तुम्हाला ओळखतात. तुम्ही त्यांचं मनोरंजन करता. पण जेव्हा तुम्ही घरी येता, तुम्ही एकटेच असता. तुम्ही इतरांप्रमाणे सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाही. तुम्ही टू-रुम फ्लॅटमध्ये राहता आणि जेव्हा संध्याकाळी बाहेर अंधार पडतो, तेव्हा जो एकटेपणा जाणवतो, त्याचं वर्णन मी शब्दांतसुद्धा करू शकत नाही. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचेही विचार होते. माझ्या मनातील भावना मी कोणालाच सांगू शकत नव्हतो.”

हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्.
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?.
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.