यूट्यूबवर ‘हा’ व्हिडीओ यावर्षी सर्वात हिट

  • Sachin Patil
  • Published On - 12:19 PM, 12 Dec 2018
यूट्यूबवर 'हा' व्हिडीओ यावर्षी सर्वात हिट

मुंबई: इंटरनेट सर्च इंजिन आणि गुगल अधिकृत यूट्यूब रिवाइंड लिस्टची घोषणा करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये ग्लोबल आणि भारतीय व्हिडीओचा समावेश आहे. तसेच यामध्ये ट्रेंडिंग आणि 2018 मधील सर्वाधिक पाहिले गेलेल्या व्हिडीओंची यादी आहे. महत्त्वाचं म्हणजे तेरी आंख्या का यो काजल हे भोजपुरी गाणं यंदा सर्वाधिक पाहिलं गेलं आहे.

यूट्यूबवर सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. हेल्थ टिप्स्, टाय बांधणे, पैसे कसे कमवायचे, भारतीय फॅशन डिझायनरसाठी काय करावं लागेल, अशा प्रकारचे सर्वाधिक व्हिडीओ पाहिले गेले आहेत. यावर्षी यूट्यूबवर नवीन डान्सही पाहायला मिळाले आहेत. ज्यामध्ये डेअरी फार्मिटसारखे डान्स पाहिले आहेत, त्यासोबतच मॅजिक आणि पेटिंगसारखे व्हिडीओही यूटयूबवर पाहिले गेले.

या वर्षातील यूट्यूबवर विस्तार पाहिला तर, यूट्यूबवर 300 चॅनलने 1 मिलियनपेक्षा जास्त अर्थात 10 लाखांपेक्षा अधिक सब्सक्राइबर्स मिळवले आहेत. तर तीन यूट्यूब चॅनेल्सने 10  मिलियन म्हणजेच 1 कोटींपेक्षा अधिक सब्सक्रायबर पूर्ण केले. विशेष म्हणजे भारतीय कंपनी टी सिरीजने 50 मिलियन अर्थात 5 कोटीपेक्षा जास्त सब्सक्राइबर्सचा टप्पा गाठला आहे.

2018 मध्ये सर्वाधिक पाहिलेले व्हिडीओ.

म्यूझिक मधील टॉप ट्रेंडिग व्हिडीओ