'सिंबा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसांची कमाई तब्बल...

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या ‘सिंबा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन तीनच दिवस झाले असताना, बॉक्स ऑफिस कलेक्शनने 100 कोटींच्या क्लबकडे वाटचाल सुरु केली आहे. तीन दिवसात ‘सिंबा’ सिनेमाने 75 कोटी 11 लाखांचा गल्ला जमवला आहे. ‘सिंबा’ची कोणत्या दिवशी किती कमाई? 28 डिसेंबर – शुक्रवार …

'सिंबा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसांची कमाई तब्बल...

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या ‘सिंबा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन तीनच दिवस झाले असताना, बॉक्स ऑफिस कलेक्शनने 100 कोटींच्या क्लबकडे वाटचाल सुरु केली आहे. तीन दिवसात ‘सिंबा’ सिनेमाने 75 कोटी 11 लाखांचा गल्ला जमवला आहे.

‘सिंबा’ची कोणत्या दिवशी किती कमाई?

  • 28 डिसेंबर – शुक्रवार – 20.72 कोटी रुपये
  • 29 डिसेंबर – शनिवार – 23.33 कोटी रुपये
  • 30 डिसेंबर – रविवार – 31.06 कोटी रुपये
  • एकूण — 75.11 कोटी रुपये

रणवीरने ‘सिंबा’च्या निमित्ताने स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे. याधी रणवीरच्या ‘पद्मावत’ सिनेमाने पहिल्या दिवशी 19 कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र, आता ‘सिंबा’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 20.27 कोटींचा गल्ला जमावल्याने रणवीरने स्वत:च्या विक्रमाला तोडून नवा विक्रम नोंदवला आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या सिनेमाची प्रदर्शना आधीही खूप चर्चा झाली. तसेच या सिनेमाचा ट्रेलरही हिट झाला होता. या सिनेमाच्या ‘आंख मारे’ या गाण्याने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले. त्यातच आता या सिनेमाने इतकी जबरदस्त सुरुवात केली.

कॉमेडी आणि अॅक्शनचं जबरदस्त कॉब्मीनेशन असलेला ‘सिंबा’ शाहरुखच्या ‘झिरो’वरही भारी पडला.  सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार येत्या दिवसांत हा सिनेमा आणखी चांगली कमाई करु शकतो.

याआधी रणवीरच्या ‘पद्मावत’ या सिनेमाने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती, ‘गुंडे’ या सिनेमाने पहिल्या दिवशी 16 कोटी 12 लाख इतका गल्ला जमवला होता. ‘गोलियो की रास लीला : राम लीला’ने पहिल्या दिवशी 16 कोटी कमवले होते, तर ‘बाजीराव मस्तानीने’ पहिल्या दिवशी 12 कोटी 80 लाखाची कमाई केली होती. तर सारा अली खान हिचा हा दुसराच सिनेमा आहे. तिने याआधी ‘केदारनाथ’ या सिनेमात काम केले, ‘केदारनाथ’ने पहिल्या दिवशी 7 कोटी 25 लाखाची कमाई केली. त्यामुळे ‘सिंबा’ हा कमाईच्या बाबतीत रणवीर आणि सारा दोघांसाठीही खूप महत्वाचा सिनेमा ठरतो आहे.

‘सिंबा’ला एकूण 4,983 स्क्रीन्सवर प्रदर्शीत करण्यात आले. ज्यापैकी भारतात 4,020 तर ओव्हरसीजमध्ये 963 स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शीत करण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *