राजा वही बनेगा जो हकदार होगा, ऋतिकच्या ‘सुपर 30’चा ट्रेलर रिलीज

"अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हक़दार होगा"

राजा वही बनेगा जो हकदार होगा, ऋतिकच्या ‘सुपर 30’चा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता ऋतिक रोशनचा बहुप्रतिक्षित ‘सुपर 30’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमात ऋतिक हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ऋतिकसोबत या सिनेमात अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 12 जुलैला प्रदर्शित होईल.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे, “अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हक़दार होगा”, या डायलॉगवरुन हा सिनेमा जबरदस्त असल्याचा अंदाज येतो. तसेच, या सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांचा प्रवास आता जगापुढे येणार आहे.

गेल्या अनेक काळापासून ऋतिकच्या चाहत्यांना त्याच्या या सिनेमाची प्रतिक्षा होती. त्यामुळे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळला. या सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांमधील एक्साईटमेंट आणखी वाढली आहे. हा सिनेमा मास्टरपीस असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरने ऋतिकच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. हा सिनेमा सुपरहीट ठरणार अशा प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर पाऊस पडतो आहे. इतकंच नाही तर सिनेमा 200 ते 400 कोटी रुपयांची कमाई करेल असाही अंदाज लावला जात आहे.

हा सिनेमा अनेक गोष्टींमुळे चर्चेत होता. गेल्या वर्षी या सिनेमाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर मीटूचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर विकास बहल यांची दिग्दर्शक पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. मीटू प्रकरणी क्लिनचीट मिळाल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा या सिनेमाचं दिग्दर्शक पद सोपवण्यात आलं.

त्याशिवाय ऋतिक रोशन आणि कंगना राणावतच्या वादामुळेही हा सिनेमा चर्चेत होता. कंगना राणावतचा मणिकर्णिका आणि त्यानंतर ‘मेंटल है क्या’ आणि ‘सुपर 30’ यांच्या प्रदर्शनाची तारीख एकाच दिवसी होती. मात्र, कंगनासोबतच्या वादापासून वाचण्यासाठी ऋतिकने बॉक्स ऑफिस क्लॅश होऊ दिला नाही. त्याने दोन्ही वेळी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.

ऋतिकचा यापूर्वी ‘काबिल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे ऋतिकला त्याच्या या सिनेमाकडूनही अनेक अपेक्षा आहेत.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *