‘Sacred Games 2’ मध्ये दोन नवे चेहरे दिसणार

मुंबई : बहुप्रतिक्षित वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच ‘सेक्रेड गेम्स 2’ सिजनचा टीजर रिलीज करण्यात आला. 26 सेकंदांच्या या टीजरमध्ये बॉलिवुड अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशिवाय दोन नवे चेहरे पाहायला मिळाले. सेक्रेड गेम्सच्या या वेबसिरीजमधील हे दोन नवे चेहरे आहेत कल्कि कोचलिन आणि रणवीर शौरे. त्यामुळे ही […]

‘Sacred Games 2’ मध्ये दोन नवे चेहरे दिसणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच ‘सेक्रेड गेम्स 2’ सिजनचा टीजर रिलीज करण्यात आला. 26 सेकंदांच्या या टीजरमध्ये बॉलिवुड अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशिवाय दोन नवे चेहरे पाहायला मिळाले.

सेक्रेड गेम्सच्या या वेबसिरीजमधील हे दोन नवे चेहरे आहेत कल्कि कोचलिन आणि रणवीर शौरे. त्यामुळे ही थ्रिलर सीरीज पाहणे प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक होणार आहे. या दोन भुमिकांचं एकूण मालिकेत काय स्थान आहे आणि ते कथेत काय नवे वळण आणणार याचीही उत्सुकता ताणली जात आहे. याचा उलगडा लवकरच होणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर शेअर करत लवकरच सीजन 2 येणार असल्याचे नमूद केले आहे.

‘पोलीस अधिकारी सरताज सिंहची मुंबई वाचवण्याची लढाई’

या वेबसिरीजविषयी दर्शकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. याची प्रचिती सीरीजचं टीजर आल्यानंतर तात्काळ आली. टीजर लॉन्च झाल्यानंतर काही तासातच लाखो दर्शकांनी हा टीजर पाहायला. ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीजनमधील कथा पोलीस अधिकारी सरताज सिंहच्या (सैफ अली खान) मुंबई शहर वाचवण्याच्या प्रयत्नांनी होईल. तसेच गणेश गायतोंडेला (नवाजुद्दीन सिद्दीकी) मुंबईचा सर्वात मोठा डॉन म्हणून जागा कायम राखण्यासाठी मिळणारे नवे मोठे आव्हानं देखील यात पाहायला मिळेल. या सुरुवातीनंतर पुढे काय होणार याबद्दल अनेक तर्क लावले जात आहे. मात्र, हे वेबसिरीज आल्यानंतरच स्पष्ट होईल.

‘गणेश गायतोंडे या पात्राच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग कश्यपकडे’

आकर्षक गुरुजी (पंकज त्रिपाठी) या पात्राची मागील सीजनमध्ये ओळख गायतोंडेचा ‘तिसरा बाप’ अशी झाली आहे. आता या सीजनमध्ये या पात्राची भूमिका अधिक महत्वाची असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपट निर्माता अनुराग कश्यप या सीजनमध्ये गणेश गायतोंडेचे दिग्दर्शन करतील. दुसरीकडे दिग्दर्शक नीरज घायवान सरताज सिंह या पात्राचे दिग्दर्शन करतील.

पहिल्या सीजनमध्ये राधिका आपटे आणि कुब्रा सेठ यांच्याही महत्वच्या भूमिका होत्या. डिसेंबर 2018 मध्ये ‘मिर्जापूर’ वेबसिरीजमधील अभिनेत्री हर्षिता गौरने ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीजनमध्ये तिला महत्वाची भूमिका मिळाल्याच्या माहितीला दुजोरा दिला होता. त्यामुळे तिलाही या सीजनमध्ये दर्शक पाहू शकतील.

पहिल्या सीजनमध्ये नवाजुद्दीनचा प्रमुख साथीदार बंटीची भूमिका करणारा अभिनेता जतिन सरना दुसऱ्या सीजनमध्ये देखील पाहायला मिळेल. पहिल्या सीजनमध्ये त्याचा मृत्यूचा झाल्याचे दाखवण्यात आले असले, तरी त्याची या सीजनमध्ये महत्वाची भूमिका असेल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.