Urfi Javed: उर्फीचा बिकिनीत हॉट अंदाज; पूलमधील व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

इन्स्टाग्रामवर उर्फीचे तीन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असलेल्या उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती नवनवीन फॅशनचे कपडे परिधान करत फोटो पोस्ट आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

Urfi Javed: उर्फीचा बिकिनीत हॉट अंदाज; पूलमधील व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Urfi Javed
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 26, 2022 | 3:32 PM

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आजवर तिच्या कोणत्या चित्रपटामुळे किंवा भूमिकेमुळे चर्चेत आली नाही. मात्र आपल्या चित्रविचित्र ड्रेसिंग सेन्समुळे ती सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. सोशल मीडियावर चर्चेत कसं राहायचं हे उर्फीला अचूकरित्या माहित आहे. अतरंगी कपड्यांमुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. कधी फुलांनी तर कधी दोरीने ड्रेस बनवून त्यावर ती फोटोशूट करते. आता उर्फीचा पूलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे उर्फीचा बिकिनी लूक पहायला मिळतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

इन्स्टाग्रामवर उर्फीचे तीन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असलेल्या उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती नवनवीन फॅशनचे कपडे परिधान करत फोटो पोस्ट आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सिझनमध्ये भाग घेतल्यानंतर उर्फी चर्चेत आली होती. कारण या सिझनमधून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक उर्फीच ठरली होती. ‘गुड पार्ट= बीच’ असं कॅप्शन देत उर्फीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पूलमधील पाण्यात ती मजा करताना दिसत आहे. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. एकाने तिला ‘जलपरी’ असं म्हटलंय. तर ‘सेक्सी लूक’ असं दुसऱ्याने लिहिलंय.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी अनेकदा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. ट्रोलर्सना उत्तर देताना तिने म्हटलं होतं, “मी मुस्लिम मुलगी आहे. म्हणूनच मला अनेकदा द्वेषयुक्त टिप्पण्या लोकांकडून ऐकायला मिळतात. मी इस्लामची प्रतिमा मलिन करत असल्याचं लोक म्हणतात. महिलांनी विशिष्ट पद्धतीने वागावं असं त्यांना वाटतं. त्यांना त्याच्या समाजातील प्रत्येक स्त्रीवर नियंत्रण ठेवायचं आहे. यामुळे मी धर्म मानत नाही. ते मला ट्रोल करतात कारण, मी त्यांच्या धर्मानुसार वागत नाही.”

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें