हिंदुस्तान घर में घुसेगा भी, और मारेगा भी, ‘उरी’चा ट्रेलर लॉन्च

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सर्जिकल स्ट्रईकचा थरार बघायला मिळतो. तर “हिंदुस्तान अब चूप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है, हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी!” परेश रावल यांच्या आवाजातील हा डायलॉग कानावर पडताच अंगावर काटा उभा […]

हिंदुस्तान घर में घुसेगा भी, और मारेगा भी, ‘उरी’चा ट्रेलर लॉन्च
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सर्जिकल स्ट्रईकचा थरार बघायला मिळतो. तर हिंदुस्तान अब चूप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है, हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी! परेश रावल यांच्या आवाजातील हा डायलॉग कानावर पडताच अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. हा चित्रपट पुढील वर्षी 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेता परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत, तर यात एका सीनमध्ये देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर देखील दिसत आहेत. या चित्रपटातील अभिनेता विकी कौशल याचा अभिनय जबरदस्त असणार आहे, असे ट्रेलरवरुन दिसत आहे. या चित्रपटात लष्कराच्या अधिकाऱ्याची भूमिका तो निभावत आहे. ट्रेलरमध्ये विकी कौशल हा एका वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे, हा लूक त्याच्या इतर चित्रपटांतील भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. यात विकी कौशल जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर चित्रपटातील सनी देओलची आठवण करवून देतो. तसेच यातील अभिनेता परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम यांची भूमिकाही महत्वाची आहे. भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन आदित्य धार यांनी केलं. गेल्या 29 सप्टेंबरला या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा प्रेक्षकांना होती.  

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.