‘उरी’ V/S ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, कुणाला मिळणार प्रेक्षकांची दाद?

मुंबई : डिसेंबर अखेरीस आलेल्या अभिनेता रणवीर सिंहचा सिंबा यासिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हे दोन सिनेमे शुक्रवारी 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही सिनेमांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने  हे दोन्ही सिनेमे चर्चेत आहेत.  ‘उरी-द […]

‘उरी’ V/S ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, कुणाला मिळणार प्रेक्षकांची दाद?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : डिसेंबर अखेरीस आलेल्या अभिनेता रणवीर सिंहचा सिंबा यासिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हे दोन सिनेमे शुक्रवारी 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही सिनेमांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने  हे दोन्ही सिनेमे चर्चेत आहेत.  ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा 2016 साली जम्मू-काश्मीर येथील सेनेच्या उरी बेस कॅम्पमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यावर आधारित आहे. तर ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. शुक्रवारी हे दोन्ही सिनेमे एकमेकांना बॉक्सऑफिसवर टक्कर देणार आहेत.

‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ :

हा सिनेमा 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेता परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत, तर या सिनेमाच्या एका सीनमध्ये देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर देखील दिसत आहेत.

या चित्रपटातील अभिनेता विकी कौशल याच्या भूमिकेची खूप चर्चा होते आहे. या चित्रपटात लष्कराच्या एका अधिकाऱ्याची भूमिका तो निभावत आहे. या सिनेमात विकी कौशल हा एका वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे, हा लूक त्याच्या इतर चित्रपटांतील भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. यात विकी कौशल जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर चित्रपटातील सनी देओलची आठवण करवून देतो. तसेच यातील अभिनेता परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम यांची भूमिकाही महत्वाची आहे. याचं दिग्दर्शन आदित्य धार यांनी केलं.

भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा चित्रपट आहे.

उरी बेस कॅम्पमध्ये त्या रात्री नेमकं काय झालं आणि भारताने त्याचा कशाप्रकारे बदला घेतला. हे बघण्याची अनेकांना उत्सुकता असेल, कदाचित या कारणामुळे प्रेक्षक हा सिनेमा बघायला जाऊ शकतात.

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ :

हा सिनेमा लेखक संजय बारु यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारीत आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे पंतप्रधान कसे बनले याचं विषयावर हा सिनेमा आहे. यात अभिनेता अनुपम खेर हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची, तर अभिनेता अक्षय खन्ना हा संजय बारु यांची भूमिका निभावत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच “मुझे तो डॉ. साहब (मनमोहन सिंह) भीष्म जैसे लगते हैं. जिनमें कोई बुराई नहीं है. पर फैमिली ड्रामा के विक्टिम हो गए. महाभारत में दो फैमिलीज थीं, इंडिया में तो एक ही है”, हा डायलॉग आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसह तत्कालीन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भूमिकाही यात आहेत. संजय बारु यांच्या भूमिकेतील अक्षय खन्ना या सिनेमाच कथा सांगताना सिनेमात दिसतात.

2004 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेत आलं, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार होत्या. मात्र, त्यावेळी भाजपचे अध्यक्ष आणि भाजपचे एकमेव खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राहुल गांधीना पंतप्रधान न बनवण्याची विनंती केली. त्यानंतर काँग्रेसला नाईलाजाने अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान नियुक्त करावे लागले, असे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर जरी हा सिनेमा बेनलेला असला, तरी सर्वाधिक निशाणा यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर साधला आहे, असे एकंदरीत ट्रेलरवरुन दिसते, त्यामुळे या सिनेमावर अनेक वाद उपस्थित झाले.

इतकेचं नाही तर अनुपम खेर यांच्यासह 14 कलाकांवर एफएरआय दाखल करण्याचा निर्णय मुजफ्फरपूर न्यायालयाने दिलेत. वादात अडकल्याने तसेच या सिनेमाच्या विषयामुळे अनेकांचे लक्ष या सिनेमाकडे वेधले गेले आहेत.

आता हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणण्यात कीती यशस्वी ठरतात, हे तर आपल्याला हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.