जळगाव (खान्देश) : जगभरात आजपासून व्हॅलेन्टाईन आठवडा (Valentine Week) सुरु झालाय. तरुणांमध्ये या आठवड्याचा एक वेगळाच जोश असतो. प्रेम ही भावनाच तशी आहे. पण प्रेमामध्ये जाणीव असते. प्रेमामध्ये जबाबदारी आणि समर्पण असतं. प्रेमातलं समर्पण सांगणारं खान्देशातील एक गाणं प्रसिद्ध आहे. आजच्या व्हॅलेन्टाईन डेच्या पहिल्या दिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला त्या गाण्याविषयी माहिती देणार आहोत. या गाण्यातील नायक हा ऊसतोड मजूर आहे. त्याची प्रेयसी ही ऊसतोड मजुराची मुलगी आहे. ऊसतोड मजुराच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष असतो. अशा परिस्थितीत फुललेलं प्रेमकथेचं काय होतं ते या गाण्याच अतिशय भावस्पर्शीपणाने मांडण्यात आलंय.